Video चिमकुले श्रीराम मंदिरात कशी आहे भक्तांशिवाय भक्ती वाचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 एप्रिल 2020

दररोज शेकडो भाविक या मंदिरात येत असतात. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर झाले असून तीस दिवसांपासून हे मंदिर भाविकांसाठी बंद आहे. 

जळगाव : शहरातील प्रसिद्ध चिमुकले श्रीराम मंदिरात सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही भगवंताची नित्योपचार पूजा, अर्चना सुरु आहे. सर्व देवदेवतांचा जन्मोत्सव साजरा करणारे हे मंदिर गेल्या महिनाभरापासून बंद आहे. श्रीराम नवमी, जन्मोत्सव सोहळाही साधेपणाने साजरा करणाऱ्या या मंदिरात दररोज मंगलआरतीनंतर विश्‍वकल्याणाची प्रार्थना केली जात आहे. 

 

पोलिस मुख्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात हे मंदिर गेल्या सव्वाशेपेक्षा अधिक वर्षांपासून आहे. मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मणाच्या मूर्ती असलेले मुख्य मंदिर आहे. समोरच गणेश, हनुमान, महादेव, बाजूला देवीचं मंदिर आहे. दररोज शेकडो भाविक या मंदिरात येत असतात. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर झाले असून तीस दिवसांपासून हे मंदिर भाविकांसाठी बंद आहे. 

रोज पूजा-अर्चना 
या स्थितीतही मंदिरात मोजक्‍या सेवेकऱ्यांच्या माध्यमातून सर्व मूर्तींची सेवा सुरु आहे. मंदिराचे मुख्य पुजारी पू. दादा महाराज जोशी यांच्याहस्ते नित्योपचार पूजा, पहाटेची काकड व मंगलआरती होत असते. सरकारच्या आदेशामुळे मंदिरातील पुजेचे वेळापत्रक बदलले आहे. माध्यान्ह समयाची आरती सध्या 9 वाजता होते. सायंकाळी आठ वाजता सायंआरती होऊन साडेआठ वाजेच्या आत मंदिर बंद केले जाते. 

Image may contain: possible text that says 'जळगाव सकाळ SIG श्री चिमुकले राम मंदिर संस्थान मोलानक'

विश्‍वकल्याणाची प्रार्थना 
मंदिरातील पुजेनंतर भगवंताला प्रार्थना केली जाते. विज्ञान, तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली. मात्र, याच विज्ञानाने मानवाच्या लोभ, काम, क्रोध या वृत्तीतून विविध व्याधींचे संकट निर्माण केले. या प्रवृत्तीवर मात करण्यासाठी म्हणून धर्माची गरज असते. धार्मिक अधिष्ठानातून अशा वृत्तींवर मात करता येते, असे मत पुजारी दादा महाराज यांनी व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon chimukle ram tempal dealy puja lockdown