चहार्डी येथील दोघा तरूणांचा अपघातात जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

चोपडा ः चोपडा शहरापासून पंधरा किमी अंतरावर असलेल्या हातेड गावाजवळ अंकलेश्‍वर- बऱ्हाणपुर या महामार्गावर चोपडाहून शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रकला दुचाकीने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले. दीपक महाजन व कैलास शर्मा असे दोन्ही मृत झालेल्या युवकांचे नाव आहे. 

चोपडा ः चोपडा शहरापासून पंधरा किमी अंतरावर असलेल्या हातेड गावाजवळ अंकलेश्‍वर- बऱ्हाणपुर या महामार्गावर चोपडाहून शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रकला दुचाकीने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले. दीपक महाजन व कैलास शर्मा असे दोन्ही मृत झालेल्या युवकांचे नाव आहे. 
चोपडा तालुक्‍यतील चहार्डी येथील रहिवासी असलेले दोन्ही युवक आज सकाळी साडेआठच्या सुमारास हातेड गावाजवळ चोपडाहून शिरपूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक- जी.जे. 01 बीवाय, 5934) ला शिरपूरहुन चोपड्याकडे येणारी बजाज डिस्कव्हर मोटर सायकलीने (दुचाकी क्र. एमएच 19, सीए 3187) समोरून जोरदार धडक दिली. यात सागर कैलास शर्मा (वय 23) व दिपक कैलास महाजन (वय 21) हे जागीच ठार झाले. हे दोन्ही युवक शिरपूर सूतगिरणीमध्ये कामास होते. ते रात्रपाळीचे काम आटोपून घरी परत येत असताना हा अपघात झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक नाना दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव, संदीप धनगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे 

बेरोजगार तरुण पोटासाठी जात होते कामास 
बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून अनेक तरुण कामाच्या शोधात आहेत. चहार्डीपासून 45 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिरपूर सूतगिरणीत चहार्डी, अकुलखेडा, चोपडा व परिसरातील बेरोजगार युवक, महिला, रोजंदारीवर दररोज कामास जावून उदरनिर्वाह करतात. दीपक व सागर हे दोन युवक 7 ते 8 महिन्यांपासून शिरपूर सूतगिरणीत कामास जात होते. आज सकाळीच त्यांच्या काळाने घात केला आहे. दोन्ही युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने चहार्डी गावावर शोककळा पसरली. 

एकूलता कुल"दीपक' 
अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही युवकातील दीपक हा घरातील एकुलता एक होता. दिपक कैलास महाजन हा एका बहिणीचा एकुलता एक भाऊ होता. तोही अपघातात गेल्याने महाजन परिवार दुःखात बुडाला आहे. तर सागर कैलास शर्मा याचे 29 जूनला लग्न होते. त्यात 12 मेस लग्नानिमित घरी पूजा ठेवली होती. सागरने आयटीआय टेक्‍निकलचे शिक्षण घेतले असल्याने तो आठ- नऊ महिन्यापासून सूतगिरणीत कामास जात होता. लग्न बंधनात अडकण्यापूर्वीच सागरचा मृत्यू झाला.

Web Title: marathi news jalgaon chopda accident daith