Vidhan sabha : "जळगाव शहर'साठी 13 उमेदवार रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

जळगावः जळगाव शहर मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघात 394 मतदार केंद्रे आहेत. सुमारे दोन हजार 384 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केले आहेत.  सकाळी 7 ते 9 या दोन तासाच्या पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रियेला शांततेत सुरवात झाली. 
एरंडोल बूथ क्रमांक 44 वर व्ही व्ही पॅट मशिन नादुरूस्त झाल्याने पाच ते सहा मिनिट मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. झोनल ऑफिसर यांनी तात्काळ मशिन बदलवत मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू केली. 

रिंगणातील उमेदवार 
अभिषेक शांताराम पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस), अशोक श्रीधर शिंपी (बहुजन समाज पक्ष), ऍड. जमील अब्दुल रौफ देशपांडे (मनसे), सुरेश दामू भोळे (भाजप), वंदना प्रभाकर पाटील (महाराष्ट्र क्रांती सेना), शफी अ. नबी शेख (वंचित बहुजन आघाडी), गौरव दामोदर सुरवाडे (बहुजन मुक्ती पार्टी), अनिल पितांबर वाघ (अपक्ष), प्रा. डॉ. आशिष एस. जाधव (अपक्ष), गोकुळ रमेश चव्हाण (अपक्ष), माया बुधा अहिरे (अपक्ष), ललित (बंटी) गौरीशंकर शर्मा (अपक्ष), शिवराम मगर पाटील (अपक्ष). 

शहर-जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त 
विधानसभा निवडणुकीसाठी आज (ता.21) मतदानाची प्रक्रिया होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहर व जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्ह्यात पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांसह होमगार्ड, राज्य राखीव दल आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, संवेदन-अतिसंवेदनशिल भागाला तर छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city 13 candidate vidhan sabha election