"सिव्हिल'मध्ये परिचारिकांनी केले नृत्य 

"सिव्हिल'मध्ये परिचारिकांनी केले नृत्य 

जळगाव : जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार सर्वश्रुत आहे. यात परिचारिकांकडून कळस गाठण्यात आल्याचे उघडकीस आले. रुग्णालयातील एसएनसीयू व बाल रुग्ण विभागातील परिचारिकांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात एसएनसीयू विभागात चक्क साऊंड सिस्टिम लावून लावण्यांवर ठेका धरल्याचा प्रकार घडला आहे. परिचारिकांच्या या नृत्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. 
जिल्हा रुग्णालयाचा कारभार दोन इमारतीत सुरू असून, नवीन इमारतीत प्रसूती विभाग, बाल रुग्ण विभाग व एसएनसीयू विभाग कार्यरत आहे. प्रसूती विभागालाच लागूनच एसएनसीयू विभाग असून, जन्मत: कमजोर असलेले नवजात बालक याठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात येतात. इतर विभागाच्या तुलनेत दुप्पट कर्मचारी या ठिकाणी कार्यरत ठेवण्यात येते. नवजात शिशू व बालकांच्या दृष्टीने या ठिकाणी वाढीव कर्मचारी असून, काही जणांचे स्टाफ या ठिकाणी कार्यरत आहे. अतिशय संवेदनशील व सदैव कार्यतत्परता या ठिकाणी आवश्‍यक असते. असे असताना बाल रुग्ण विभाग व एसएनसीयू विभागातील परिचारिकांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त लावण्यांसह सिनेमाच्या विविध गाण्यांवर नृत्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com