उष्माघातासाठी अवघे एक बेड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

जळगाव ः शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या तापमानामुळे उष्णतेची लाट पसरली आहे. जळगावातील पारा 45 अंशांवर पोहोचला असून, वाढत्या तापमानामुळे उष्माघाताची लक्षणे आढळून येत असलेले रुग्ण वाढत आहेत. हे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होत असताना तेथे मात्र अवघ्या एका बेडची सुविधा करून काम भागविले जात आहे. गेल्या दोन दिवसांत तीन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असूनही, एक बेड घेऊन बसलेले जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र जागे झालेले दिसत नाही. 

उन्हाळ्याचा तडाखा आता चांगलाच जाणवू लागला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून उष्णतेची तीव्रता वाढली असून, गेल्या आठवड्यात जळगावातील तापमान 44-45 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. या वाढलेल्या तापमानाचा त्रास होऊन उष्माघाताची भीती नागरिकांमध्ये आहे. या आठवड्यात "मे हीट'चा जबरदस्त तडाखा जाणवत असून, उष्माघाताचा त्रास झालेले रुग्णही वाढले आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालय व महापालिकेच्या शाहू महाराज रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू करण्यात येतो. उष्माघाताची काही लक्षणे आढळल्यानंतर संबंधित रुग्णाला कक्षात दाखल केले जाते. त्यानुसार महापालिका व जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे सुविधा करण्यात आली आहे. 
जिल्ह्यातून उष्माघाताचा त्रास झालेले रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होतात. यासाठी जिल्हा रुग्णालयात सुविधा करण्यात आली आहे, पण ती नावापुरतीच आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच उष्माघात कक्ष असे नाव देऊन येथे एका बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजे या ठिकाणी उष्माघाताचा त्रास झालेले दोन किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठीची सुविधाच नाही. मुळात या ठिकाणी स्वतंत्र कक्ष उभारून तेथे डॉक्‍टरांचे स्वतंत्र पथकही उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. पण तशी सुविधा येथे नसल्याचे दिसून आले आहे. 
.... 

आतापर्यंत चौघांचा बळी 
जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे उष्माघाताचे रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत चार जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात यावल तालुक्‍यातील एकाचा मृत्यू झाला होता; तर मागील दोन दिवसांत तिघांचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताचा त्रास होऊन मृत्यू झाला असतानाही जिल्हा रुग्णालयात उष्माघात किंवा त्याची लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद झालेली नाही. मृत्यू होण्याचे दुसरेच कारण सांगितले जात आहे. तथापि, जिल्हा रुग्णालयात उष्माघातावर उपचारासंबंधी सुविधा वाढविण्याची मागणी होत आहे. गेल्या शुक्रवारी (4 मे) साकरी (ता. भुसावळ) येथील अभय फेगडे व खडकी येथील लक्ष्मण बारेला, शनिवारी (5 मे) राणीचे बांबरूड (ता. पाचोरा) येथील जमनालाल रेगर, तर आज (6 मे) मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील बापूराव देवराम साळुंखे (वय 55) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला.

Web Title: marathi news jalgaon civil sunstroke