ढगाळ वातावरणाने पारा घसरला! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

ळगाव ः गेल्या दोन आठवड्यांपासून सूर्याचा प्रकोप दिवसागणिक वाढत होता. मार्चअखेर तर पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती. यामुळे पंधरवड्यापासून दुपारी झळा सहन कराव्या लागत होत्या. परंतु दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागत असून, काल रात्री जिल्ह्यात वादळी वारा व ढगाळ वातावरण होते. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उन्हाची जाणीवच झाली नाही, शिवाय तापमानातही तीन अंशांची घसरण होऊन ते 39 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. 

शहरातील तापमानात आठवडाभरापासून प्रचंड वाढ होत होती. आठवडाभरापासून जळगावचे तापमान 43 अंशांवर स्थिर होते. मात्र, काल रात्री वादळी वारा आणि काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. यामुळे आज तापमान तीन अंशांनी घसरून 39 अंशांवर पोहोचले. यामुळे असह्य झळांमुळे त्रस्त जळगावकरांना दिलासा मिळाला. वाढलेल्या तापमानामुळे तीव्र उन्हाचे चटके आणि असह्य झळांमुळे शहरातील रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट दिसत होता. पण आज सकाळपासून ढगाळ वातावरणाने हवेतही गारवा निर्माण झाला आहे. यामुळे दुपारी उन्हामुळे कमी होणारी वाहतूक आज पाहावयास मिळाली नाही. 

दिवसभर ढगाळ वातावरण 
उष्णतेचा दाह जाणवत असताना काल रात्री ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारा आणि विजा चमकत होत्या. काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. आजही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे 43 अंशांवर पोहोचलेला पारा आज तीन अंशांनी खाली येत आज कमाल 39 अंश सेल्सिअस व किमान 28 अंश सेल्सिअसवर येऊन थांबल्याची नोंद झाली. असे वातावरण आणखी दोन दिवस राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

Web Title: marathi news jalgaon climet change tempreture