जळगाव गारठले... पारा @ 6.4 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

जळगाव : मावळत्या वर्षाच्या अखेरीला हवेत असलेला गारठा वाढत आहे. गेल्या आठ- दहा दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कडाक्‍याच्या थंडीची लाट आली आहे. मध्यंतरी दोन- तीन दिवस थंडीचा जोर कमी झाला होता. मात्र, दोन दिवसांपासून अचानक थंडीची लाट परतल्याने जळगावचा पारा 6.4 अशांवर आला आहे. 

उत्तर भारतात थंडी आणि धुक्‍याने जनजीवन प्रभावित झाले आहे. थंडीचा प्रभाव राज्यात देखील जाणवत आहे. यामुळे मध्यंतरी गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. पहाटेपासूनच गार वारे वाहत असल्याने थंडीचे प्रमाण अधिकच जाणवत आहे. दिवसभर थंडी जाणवत असल्याने ठिकठिकाणी सकाळी व सायंकाळी शेकोट्या पेटविलेल्या पाहावयास मिळत आहे. थंडीची लाट अजून दोन- तीन दिवस कायम राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. गेल्या आठवड्यात तापमान आठ अंशावर पोहचले होते. यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीचा जोर काहीसा कमी झाला होता. परंतु दोन दिवसांपासून थंडीची लाट आल्याने पारा खाली येऊन आज किमान तापमान 6.4 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. 

गार वाऱ्याने हुडहुडी 
शहरात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत कमी आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्यंतरी गायब झालेल्या थंडी पुन्हा परतली. हुडहुडी भरविणाऱ्या या परतीच्या थंडीने जळगावकर चांगलेच गारठले. दिवसा देखील गार वाऱ्याने अंगात हुडहुडी जाणवत आहे. यामुळे दुपारचे ऊन देखील अगदी पहाटेच्या कोवळ्या उन्हाप्रमाणे जाणवत आहे.

Web Title: marathi news jalgaon cold 6.4 tempreture