जळगावकर गारठले; पारा 8.5 अंशावर 

जळगावकर गारठले; पारा 8.5 अंशावर 

जळगाव ः गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कडाक्‍याची थंडी पडल्यानंतर या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडी गायब झाली होती. यामुळे काहीसा उकाडा जाणवू लागला होता. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा गारठा वाढत असून, कालच्या किमान तापमानात चार अंशाची घसरण होऊन जळगावचे तापमान पुन्हा 8.5 अंशावर खाली आले आहे. 

आठवडाभरापूर्वी कडाक्‍याच्या थंडीने जळगावकर चांगलेच गारठले होते. दोन- तीन दिवसांपूर्वी काहीसा उकाडा जाणवू लागला होता. यात कमाल आणि किमान तापमानात देखील वाढ झाली होती. फेब्रुवारी महिना म्हटला म्हणजे उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरवात होत असते. मात्र, यंदा गायब झालेली थंडी पुन्हा परतून येत असल्याचा अनुभव येत आहे. गेल्या आठवड्यात किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या घरात आले होते. यामुळे थंडी जाऊन आता उन्हाचे चटके जाणवू लागणार असेच चित्र निर्माण झाले होते. मात्र दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण होऊन अचानक गार वारे वाहू लागल्याने याचा परिणाम किमान तापमान खाली येण्यावर झाला. परिणामी गारठा वाढल्याने थंडीने जळगावकर गारठले आहे. 

दोन दिवसात सहा अंशाची घसरण 
गेल्या आठवड्यात कमाल तापमान 33 अंश तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअसवर गेले होते. परंतु दोन दिवसांपासून गार वारे वाहू लागल्याने गारठा वाढला. यामुळे कमाल व किमान तापमानात घसरण झाली होऊन दोन दिवसात किमान तापमानात सहा अंश सेल्सिअसची घसरण झाली. बुधवारी (ता. 6) 15 अंश सेल्सिअसवर असलेले किमान तापमान सहा अंशानी खाली येऊन आज (ता. 9) 8.5 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान देखील 27 अंशावर आले इतक्‍या तापमानाची नोंद झाली. यामुळे आज दिवसभर गारवा जाणवत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com