ट्‌विटरवरील तक्रारीची वीज कंपनीकडून दखल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

चोपडा : ट्‌विटरवरून एका ग्राहकाने वीज कंपनीच्या पोर्टलवर तक्रार केली होती. या तक्रारीची चोपडा शहर उपअभियंत्यांनी तत्काळ दखल घेऊन चुकीचे दिलेले वीज बिल तत्काळ दुरुस्ती करून दुसरे बिल देण्यात आले. 

चोपडा : ट्‌विटरवरून एका ग्राहकाने वीज कंपनीच्या पोर्टलवर तक्रार केली होती. या तक्रारीची चोपडा शहर उपअभियंत्यांनी तत्काळ दखल घेऊन चुकीचे दिलेले वीज बिल तत्काळ दुरुस्ती करून दुसरे बिल देण्यात आले. 
दिवसेंदिवस सोशल मीडियावरील व्हॉट्‌सऍप, फेसबुक, प्रभावी वापर केला जातो. याच पार्श्‍वभूमीवर ट्‌विटर अकाउंटच्या माध्यमातून वीज कंपनीच्या पोर्टलवर मोहरद (ता. चोपडा) येथील नीरज सुभाष बेहडे (ग्राहक क्रं.135607009034 बी यु 023) या शेतकऱ्याने 12 जुलैला वीज बिल चुकीचे आले असल्याची तक्रार (क्रमांक 8097220) तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटले होते, की कृषी पंपधारक असून माझ्याकडे 16 कनेक्‍शन आहेत. ज्यांचे बिल नियमित भरत आहेत. मात्र, मागील एक बिल जास्त आलेले आहे. ते बिल कमी करण्यासाठी दीड महिन्यांपासून वीज कंपनीच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहे. मात्र, अधिकाऱ्यांनाच वसुलीची गरज दिसत नसल्याचे दिसून येते. वास्तविक कृषी बिल भरण्यास कुणी शेतकरी तयार नाहीत. मी बिल भरण्यास तयार असूनही याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी वीज कंपनीच्या संकेतस्थळावर म्हटले होते. याची तत्काळ दखल घेण्यात आली. ही तक्रार विभागीय कार्यालयाकडून कार्यकारी अभियंता व्ही. व्ही. कुलकर्णी 
यांच्याकडे आली. तेथून उपकार्यकारी अभियंता मेघश्‍याम सावकारे यांच्याकडे येऊन त्यांनी या तक्रारीचे तत्काळ निवारण केले. तक्रारीचे निवारण झाल्याने ग्राहक नीरज बेहडे यांनी समाधान व्यक्त करीत अभियंता मेघश्‍याम सावकारे यांचा ऋणनिर्देशही केला. 

Web Title: marathi news jalgaon complent twiter mahavitaran