कंटेनरच्या अपघातात तरुणाचा मृत्यू 

कंटेनरच्या अपघातात तरुणाचा मृत्यू 

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अजिंठा चौफुलीजवळील हॉटेल मानसजवळ भुसावळकडून पाळधीकडे जाणाऱ्या कंटेनरने पादचारी तरुणास जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने चालकाला चांगलेच बदडले यानंतर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेच्या दोन तासानंतर संतप्त जमावाने 

गुफरान खान अजमल खान (वय 22, रा. सालारनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त जमावाने चालकास चांगले बदडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. गुफारान खान हा नशिराबाद जि.प. शाळेचे मुख्याध्यापक अजमलखान यांच्या मुलगा होय. त्याच्या पश्‍चात दोन भाऊ आई वडील असा परिवार आहे. मृत गुफराने एमबीएचे शिक्षण घेतले होते. तो एस्टर होंडा या ठिकाणी सेल्स एक्‍सीकेटीव्ह म्हणून कामाला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com