जनता कर्फ्यूमध्ये टाळ्यासह फडकविला तिरंगा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

शहरातील सालारनगरातील अली मेंशन, खदीजा हाइट्‌स, रहमत आपारमेंट व मासूम वाडी येथील तरुणांनी संध्याकाळी पाच वाजता आपल्या घरातून उतरून रस्त्यावर शंभर फूट तिरंगा फडकवून पंतप्रधानसह आरोग्य विभाग, पोलीस विभाग, प्रसारमाध्यमे व आवश्‍यक सेवा देणारे यांचे आभार मानले

जळगाव : सकाळपासून पंतप्रधानांच्या आव्हानानुसार जनता कर्फ्यूच्या माध्यमाने कोणीही बाहेर निघाले नाही. परंतु सायंकाळी टाळ्या वाजवून आभार मानण्यात आले. या दरम्यान सालारनगरमधील तरूणांनी घराबाहेर येत टाळ्या वाजविण्यासोबत शंभर फुटी तिरंगा फडकावून आवश्‍यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानले. 

शहरातील सालारनगरातील अली मेंशन, खदीजा हाइट्‌स, रहमत आपारमेंट व मासूम वाडी येथील तरुणांनी संध्याकाळी पाच वाजता आपल्या घरातून उतरून रस्त्यावर शंभर फूट तिरंगा फडकवून पंतप्रधानसह आरोग्य विभाग, पोलीस विभाग, प्रसारमाध्यमे व आवश्‍यक सेवा देणारे यांचे आभार मानले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा विनंती केली; की आम्ही आपल्या रुणात राहू जर आपण एक एप्रिलपासून होणारे एनपीआर रद्द कराल. 

एनआरसी रद्दची मागणी 
विश्व एक वेगळ्या संक्रमणातून जात आहे. संपूर्ण भारतात ज्याप्रमाणे कोरोना व्हायरसमुळे लोक हवालदील झाले आहेत. त्याचप्रमाणे एनआरसी, एनपीआर व सीएएमुळे लोकांमध्ये सुद्धा दहशत पसरलेली आहे. त्यामुळे आतातरी नरेंद्र मोदींनी हा कायदा त्वरित रद्द करावा; अशी एकमुखी मागणी करण्यात आली. यावेळी फारुक शेख, आसिफ पटेल, अरबाज शेख, सिद्दीक शेख, अमीर शेख, रहीम शेख, तय्यब शेख, सय्यद फैजान सय्यद शोएब, अहमद शाह, शेख मोहसीन अब्दुल व रहीम आदींची उपस्थिती होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona janta karfew flag salute