रात्रीच केले त्याने पलायन अन्‌ वाढली साऱ्यांची धडधड...सकाळी मात्र सापडला 

corona positive case
corona positive case

सावदा : शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण जळगावच्या कोविड रूग्णालयात उपचार घेत होता. पण तो हॉस्पिटलमधून पळून येऊन शहरात आपल्या घरी मुक्कामी राहिला. आज (ता. २४) सकाळी त्याला प्रशासनाने पुन्हा हॉस्पीटलमध्ये रवाना केले. हा धक्कादायक प्रकार काल रात्री घडला. यामुळे पोलिस व प्रशासनाची एकच तारांबळ व धावपळ झाली.

शहरातील रहिवासी काही दिवसापूर्वी मुंबईहून सावदा येथे आला होता. त्यास खोकला व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तो परस्पर जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. तेथे त्याचा अहवाल हा  पॉझिटीव्ह आला. दरम्यान, उपचार सुरू असतानाच तो रूगलयातून पळून साळी बागेतील गणपती मंदिराजवळच्या आपल्या घरी पळून आला होता. तिकडे सिव्हील हॉस्पिटलमध्ये मात्र रुग्णाची शोधाशोध सुरू झाली. आणि हा रुग्ण अखेर सावदा येथील आपल्या घरी मिळून आला. आज पहाटे पाचच्या सुमारास या व्यक्तीला पोलिस व पालिका प्रशासनाने रूग्णवाहिकेतून पुन्हा जळगाव येथील जळगावच्या कोविड रूग्णालयात रवाना केले. 


शहरात या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाने मुक्काम ठोकल्याचे उघडकीस आल्यानंतर मुख्याधिकारी सौरभ जोशी व सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पालिका कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, आरोग्य निरीक्षक महेश चौधरी आदींनी पाहणी करून उपाययोजना केल्या. या रुग्णाच्या कुटुंबातील व संपर्कातील लोकांना कोरोना केअर सेंटर मध्ये विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

परस्पर जळगाव जाऊ नये
काही नागरिक हे स्थानिक प्रशासनाला कोणतीही माहिती न देता, जळगाव येथे उपचारासाठी जात आहे. मात्र परस्पर गेलेले काही रुग्ण हे कोरोना बाधित आढळून आल्याने अशावेळी स्थानिक प्रशासनाची खूपच धावपळ होते. उपाययोजना करण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्याशिवाय व परवानगीशिवाय परस्पर जळगावला जाऊ नये, असे आवाहन सहाय्य्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ व मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com