esakal | धक्‍कादायक : जिल्ह्यात 26 कोरोनाचे नवीन रूग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढतच आहे. त्यास आटोक्‍यात आणणे कठीण होत चालले असून, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा चारशेच्यावर पोहचला आहे. जिल्ह्यातील हा आकडा काही दिवसातच पाचशे पार होण्याचे चित्र सध्या तरी आहे. दिवसभरात जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या 527 अहवाल प्राप्त झाले होते. यापैकी केवळ 7 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते.

धक्‍कादायक : जिल्ह्यात 26 कोरोनाचे नवीन रूग्ण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी एक देखील रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला नसताना आज देखील दिवसभरात 527 पैकी 520 जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने एक दिलासादायक चित्र होते. परंतु रात्री उशिराने आलेल्या अहवालांमधील 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधितांचा आकडा चारशे पार गेला आहे. 
कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढतच आहे. त्यास आटोक्‍यात आणणे कठीण होत चालले असून, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा चारशेच्यावर पोहचला आहे. जिल्ह्यातील हा आकडा काही दिवसातच पाचशे पार होण्याचे चित्र सध्या तरी आहे. दिवसभरात जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या 527 अहवाल प्राप्त झाले होते. यापैकी केवळ 7 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. यामुळे पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याचे चित्र जाणवत होते. मात्र रात्रीच्या अहवालात 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा एक धक्‍का जिल्ह्याला बसला आहे. 
 
114 जणांचे अहवाल प्राप्त 
जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, वरणगाव, धरणगाव व पारोळा येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 114 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. त्यापैकी 88 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सव्वीस व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसवाळ येथील 21, वरणगावचे 3, चाळीसगाव व पारोळा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 414 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 


शहरासाठी दिलासा 
जळगाव शहरातील पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या देखील वाढली आहे. यात शुक्रवारी (ता.21) जळगाव शहरातील तब्बल 29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. यात वाघनगरातील 13 जणांचा समावेश होता. मात्र आजच्या आलेल्या अहवालातील केवळ एकच जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरासाठी आज तरी दिलासा मिळाला आहे. 


 

loading image
go to top