"कोरोना से डरोना' म्हणत जळगावकरांनी उडविले रंग! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 March 2020

धूलिवंदनानिमित्त आबालवृद्धांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळतो. त्यात विविध संस्था तसेच आयोजकांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात काव्यरत्नावली चौकात पाण्याचे हौद बांधून तरुणाई त्यात मनसोक्त धुळवडीचा आनंद लुटतात. यंदा "कोरोना'चा प्रतिबंध व्हावा, तसेच शासनाकडूनही धुलिवंदनचे कार्यक्रम न घेण्याच्या आवाहनाला अनेक आयोजकांनी साथ देत आपले नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचे जळगाव शहरात दिसून आले. 

जळगाव : शहरात धूलिवंदनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. यात अनेक ठिकाणी पाण्याचे हौद, रेन वॉटर अशा अनेक प्रकारे रंगाची उधळण केली जाते. परंतु यंदा "कोरोना' व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यासाठी शासनाकडून रंगपंचमी तसेच सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जळगाव शहरात चांगला प्रतिसाद लाभला. अनेक ठिकाणचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र, "कोरोना से डरोना' म्हणत अनेकांनी कोरडी धुळवड खेळून रंगाची उधळण केली. 

Image may contain: 10 people, people standing

शहरात दरवर्षी धूलिवंदनानिमित्त आबालवृद्धांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळतो. त्यात विविध संस्था तसेच आयोजकांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात काव्यरत्नावली चौकात पाण्याचे हौद बांधून तरुणाई त्यात मनसोक्त धुळवडीचा आनंद लुटतात. तसेच नेहरु चौकात नेहरू मित्र मंडळातर्फे "रेन डान्स'मध्ये तरुण-तरुणी थिरकताना दिसतात. अशा अनेक ठिकाणी लहान मोठ्या स्वरूपात धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतो. परंतु यंदा "कोरोना'चा प्रतिबंध व्हावा, तसेच शासनाकडूनही धुलिवंदनचे कार्यक्रम न घेण्याच्या आवाहनाला अनेक आयोजकांनी साथ देत आपले नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचे जळगाव शहरात दिसून आले. 

Image may contain: 13 people, people standing and outdoor

एकाच ठिकाणी कार्यक्रम 
शहरात "कोरोना'मुळे अनेक ठिकाणचे कार्यक्रम रद्द झाले. यात काव्यरत्नावली चौक, नेहरू चौक मित्रमंडळ, मू. जे. महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालयात होणारा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले. तसेच शहरातील अनेक मुख्य चौकात तुरळक स्वरूपात धुळवड खेळताना दिसून आले. केवळ जे. के. पार्कमध्ये धूलिवंदन कार्यक्रम झाला. 

कोरड्या रंगाची उधळण अधिक 
पाण्याचा वापर न करता कोरड्या रंगाचा धूलिवंदन खेळण्यावर नागरिकांनी भर दिल्याचे दिसून आले. यात घरोघरी मित्रमैत्रिणांचे ग्रुप, काही कुटुंबांनी एकत्र येऊन कोरड्या रंगाची उधळण करून रंगपंचमी खेळली. लहान मुलांमध्ये देखील उत्साह दिसून येत असला तरी नैसर्गिक व कोरड्या रंगाने धूलिवंदन खेळणे हे कटाक्षाने पाळले जात असल्याचे दिसून आले. 

डीजे, ढोल-ताशांवर थिरकली तरुणाई 
धूलिवंदनानिमित्त अनेक ठिकाणी डीजे, ढोल-ताशांच्या गजरात तरुणाई रंगाची उधळण करताना दिसून आली. यात मू. जे. महाविद्यालयाच्या मुला-मुलींचे वसतिगृह, अनेक कॉलन्या, मुख्य चौकात, व्यापारी संकुले, वसाहतीमध्ये एकत्र येऊन डीजे, ढोल-ताशांच्या गजरात रंगांची उधळण केली जात असल्याचे दिसून आले. 

कोरड्या रंगांसाठी झुंबड 
होळी व धूलिवंदनानिमित्त शहरात विविध ठिकाणी पिचाकाऱ्यासह रंग विक्रीची विविध दुकाने थाटलेली होती. त्यात आज अनेक चौकात लागलेल्या दुकानांवर रंग घेण्यासाठी एकच गर्दी सकाळी दिसून आले. यात सर्वांत जास्त कोरड्या रंग घेण्याकडे कल असल्याची माहिती रंग विक्रेत्यांनी माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus bur rangpanchami celibret city