शहरातील आठ हॉटेलांत मिळणार फूड पार्सल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्चपर्यंत शहरासह जिल्ह्यातील हॉटेल्स रेस्टॉरंट खानावळ ठिकाणे गर्दी होऊ नये म्हणून बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

जळगाव : शहरातील गरजू नागरिकांना जेवणाचे पार्सल घेऊन जाण्यासाठी आठ हॉटेलांना फक्त पार्सल सुविधा वितरित करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. 

हेपण पहा - नागरिकांनो, या वेळेतच खरेदीसाठी बाहेर पडा! 

याबाबतचे आदेश देखील जारी करण्यात आले. शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्चपर्यंत शहरासह जिल्ह्यातील हॉटेल्स रेस्टॉरंट खानावळ ठिकाणे गर्दी होऊ नये म्हणून बंद ठेवण्याचे आदेश आहेत. दरम्यान, उपाययोजनांचा भाग म्हणून शहरातील आठ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांना केवळ पार्सलची सुविधा वितरित करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉक्‍टर ढाकणे यांनी दिली आहे. या परवानगी देण्यात आलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मधून नागरिकांना केवळ फूड पार्सल नेता येणार आहे. याठिकाणी गर्दी होऊ नये याची जबाबदारी संबंधित हॉटेल चालक व मालक यांनी घ्यावयाची आहे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

नक्‍की वाचा - वडीलांचा मृत्यू..पण ना खांदा देता आला ना झाले अंतिम दर्शन
 
या हॉटेलमधून मिळेल पार्सल 
हॉटेल सिल्वर पॅलेस, मुरली मनोहर, शालीमार, हॉटेल गौरव, हॉटेल जलसा, हॉटेल रसिका मुरलीमनोहर रेस्टॉरंट, उत्तम भोज अशा आठ ठिकाणाहून फुड पार्सल नागरिकांना उपलब्ध होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus food parcel permission city 8 hotels