जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ; सुभाष चौक बाजारात

market
market

जळगाव : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे यावर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील गर्दीचे ठिकाणे म्हणजेच आठवडे बाजार, बियरबार, नाश्‍त्याची दुकाने हे ता. 31 रोजी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. शहरातील आठवडे बाजारात आजपासून बंद ठेवणण्यात आला. मात्र दररोज भरणारा सुभाषचौक व बळीरामपेठेतील बाजारात नेहमीपप्रमाणेच गुर्दी दिसून आली. त्यामुळे या ठिकाणी त्यामुळे नागरिकांसह विक्रेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली होत असून त्यांच्या आदेशांना हरताळ फासले जात आहे. 

जिल्ह्यात कोरोनाच्या संशयीत रुग्णांमधये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कोरोनाचा व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून उपायोजना केल्या जात आहे. याचसोबतच ज्याठिकाणी नागरिकांनी गर्दीच्याठिकाणी होणारे कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात भरणारे आठवडे बाजार, बियरबार, पानटपरी यासह गर्दीचे ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. मात्र तरी देखील शहरातील फुले मार्केट, गांधी मार्केट, सुभाष चौक, बळीराम पेठेतील डेली बाजार नेहमीप्रमाणे भरविला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. याठिकाणी सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने नागरिकांसह विक्रेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून लावले जात असल्याचे दिसून येत आहे. 

आठवडे बाजार बंद अन्‌ डेली बाजारात गर्दी 
जिल्हाभरातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर आज शनिवारी कासमवाडी परिसरात भरणारा आठवडे बाजार प्रशासनाकडून बंद करण्यात आला. मात्र सुभाष चौक, दाणा बाजार, शिवाजी रोडयासह फळ बाजार व बळीरामपेठेत भरणारा डेली बाजार नेहमीप्रमाणे भरलेला होता. आज शनिवार असल्याने नागरिकांनी याठिकाणी सकाळपासून खरेदीसाठी गर्दी केलेली असल्याने एकीकडे आठवडे बाजार बंद करायचा आणि दुसरीकडे डेली बाजार सुरु ठेवायचे असे चित्र आज दिसून आले. 

बाजार भरविण्यावरुन कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये वाद 
शहरातील कासमवाडी परिसरात भरणारा आठवडे बाजारात आज सकाळपासून भाजीपाला विक्रेत्यांसह इतर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. मात्र काही वेळानंतर महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे पथक त्याठिकाणी दाखल होत त्यांनी विक्रेत्यांनी लावलेली दुकाने उठविवून कारवाई करण्याचा इशारा दिला. यावेळी परिासरात पथकातील कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये तू तू मै मै देखील झाली. दरम्यान वेळी एका भाजीपाला विक्रेत्याचा माल अतिक्रमण विभागाने जप्त केल्यानंतर माल परत मिळावा. यासाठी त्या विक्रेत्याने मनपाच्या ट्रॅक्‍टरखाली झोपून माझ्या अंगावरुन ट्रॅक्‍टर न्या अन्यथा माझा माल परत द्या असे सांगत कर्मचाऱ्यांशी वाद घातला. 

पानटपरीसह नाश्‍त्यांची दुकाने सर्रास सुरु 
जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शहरातील नाश्‍त्याची दुकाने, हातगाड्यां यासह पानपटपरींवरव होणारी गर्दी कमी होण्यासाठी त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. शहरातील मुख्यभागात असलेल्या पानटपरी व काही नाश्‍यांची दुकाने विक्रेत्यांनी बंद ठेवून आदेशांचे पालन केले होते. मात्र शहरातील मध्यवर्ती भागात असलेली नाश्‍तयाची दुकानांवर व पानटपरी सर्रासपणे सुरु ठेवून त्याठिकाणी गर्दी झाली असल्याचे चित्र शहरात दिसून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com