जळगावात कोरोनाचा पहिला बळी..24 तासात मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

60 वर्षीय रुग्णावर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. 

जळगाव : शहरातील दाटलोकवस्ती असलेल्या सालार नगरातील 60 वर्षीय कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. या रुग्णावर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा आज दुपारच्या सुमारास कोरोनामूळे मृत्यू झाला. कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरुन गेली आहे. 

कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण हा गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने याठिकाणाहून त्यांची जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली. दरम्यान या रुग्णाचा अहवाल बुधवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ माजली होती. या 60 वर्षीय रुग्णावर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. शहरात कोरोनाच्या रुग्णाचा पहिला बळी गेल्याने संपूर्ण वैद्यकीय, आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरुन गेली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Corona's first victim in Jalgaon: death in 24 hours