coronafighter मनपा दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचा अहोरात्र लढा 

doctor
doctor

जळगाव : शहरात "कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत दोन रुग्णांचे अहवाल "पॉझिटिव्ह' आले. त्यातील एकाचा बुधवारी मृत्यू झाला. अशा या महाभयंकर आजाराला थोपविण्यासाठी महापालिकेच्या दवाखाना विभागाचे डॉक्‍टर, परिचारिका यांच्यासह वैद्यकीय विभागातील सुमारे दोनशे जणांचे पथक 24 तास सेवा देत आहेत. नागरिकांच्या तपासणीसह लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हे कर्मचारी करीत आहेत. 
जिल्ह्यात "कोरोना' संशयितांची संख्या सुमारे 98 आहे. तसेच शहरातील दोन "पॉझिटिव्ह' रुग्ण आढळलेल्या मेहरुण व सालारनगर हा भाग सील केला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांची आरोग्य तपासणी व सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. यासाठी सुमारे दोनशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कर्मचारी तपासणीसोबत जनजागृती देखील करीत आहेत. "कोरोना'ची लक्षणे, त्यावरील उपाययोजना याबाबत पोस्टर, हॅण्ड बिल देऊन जनजागृती पथकाकडून केली जात आहे. 

पथकाला असहकार्य 
रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेच्या दवाखाना विभागाचे डॉक्‍टर, परिचारिका, आशा वर्कर यांच्या पथकाद्वारे नागरिकांची तपासणी केली जात आहे. परंतु नागरिक तपासणीला सहकार्य करत नसून, व्यवस्थित माहिती देत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

जीव धोक्‍यात घालून सेवा 
महापालिकेचे डॉक्‍टर, परिचारिका आदी वैद्यकीय यंत्रणेतील कर्मचारी "कोरोना'बाधित रुग्णाच्या कुटुंबाशी संवाद साधून त्यांची तपासणी, परिसरात तपासणी कमी उपाययोजना करीत आहेत. परंतु स्वत:ची योग्य काळजी व ठराविक अंतर ठेवत जीव धोक्‍यात घालून ते आपली सेवा बजावून "कोरोना'शी खऱ्या अर्थाने लढा देत आहेत. 
 
चोवीस जण "क्वॉरंनटाइन' 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात "कोरोना' कक्ष आहे. तसेच महापालिकेचे शाहू रुग्णालय हे देखील "कोरोना'साठी अधिग्रहीत करून तेथे क्वॉरंटाइन व इनसुलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. येथे 50 जणांची सुविधा येथे केली असून, येथे 24 जणांना सध्या क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com