कपाशीत हेक्‍टरी पंधरा किलोची घट 

कपाशीत हेक्‍टरी पंधरा किलोची घट 

जळगाव ः जिल्ह्यात यंदा झालेल्या कमी पावसाने खरिपाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. जिल्ह्यात 67 टक्केच पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी वातावरण आहे. असे असले तरी तुरीच्या उत्पादनात प्रतिहेक्‍टर गतवर्षीपेक्षा चार क्विंटलची घट झाली. जिरायती व बागायती कपाशीच्या उत्पादनात हेक्‍टरमागे अकरा ते पंधरा किलोची घट आली आहे. कृषी विभागातर्फे विविध ठिकाणी घेतलेल्या मुख्य पीक कापणी प्रयोगातून हे चित्र समोर आले आहे. 
पीक कापणी प्रयोगानुसार 2017-18 मध्ये जिरायती कपाशीचे उत्पादन (प्रतिहेक्‍टरी) 6 क्विंटल 350 किलो आले होते. कमी पावसामुळे 2018-19 मध्ये उत्पादन 6 क्विंटल 339 किलो आहे. यावरून दर हेक्‍टरी 11 किलोची घट झाली आहे. 
बागायतीचे उत्पादन 2017-18 मध्ये 11 क्विंटल 540 किलो आले होते, तर 2018-19 मध्ये 11 क्विंटल 57 किलो उत्पादन आले. 2017-18 मध्ये तुरीचे उत्पादन प्रतिहेक्‍टरी 7 क्विंटल 247 किलो होते. 2018-19 मध्ये 4 क्विंटल 737 किलो आले. हेक्‍टरमागे पावणेचार क्विंटलची घट झाली आहे. 
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. दोन वेळाच अधिक पाऊस झाला. परतीचा पाऊस आलाच नाही. यामुळे खरिपाच्या उत्पादनात काहीअंशी घट झाली. जर शेवटी किमान दोनदा परतीचा पाऊस झाला असता, तर कपाशीचे उत्पादन 2017-18 च्या उत्पादनापेक्षा वाढले असते. मात्र परतीचा पाऊसच झाला नसल्याने मुख्य पिकांच्या उत्पादनात घट झाली. 
तूर, ज्वारी, मका, भुईमूग, उडीद, मूग या पिकांना कमी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. याचे मात्र उत्पादन घटले आहे. त्यामानाने या पिकांचे क्षेत्रही कमी असते. कपाशीच्या शेवटच्या हंगामानंतर शेतकऱ्यांनी शेतातील कपाशी उपटून फेकली. त्याबरोबरच तुरीचे पीकही उपटून फेकले. कारण पावसानेच ओढ दिली होती. 
 
कपाशीवर 2017 मध्ये झालेल्या गुलाबी बोंडअळीच्या प्रार्दुभावामुळे यंदा शेतकऱ्यांनी कपाशीवर बोंडअळी न येण्यासाठी योग्य ती काळजी घेतली. यामुळे यंदा बोंडअळीचा प्रार्दुभाव कपाशीवर झाला नाही. एक ते दोन टक्केच प्रादुर्भाव राहिला. 
 
पावसाळ्यात परतीचा पाऊस झाला नाही. तो झाला असता तर कपाशीचे अधिक उत्पन्न आले असते. तुरीच्या उत्पादनात मात्र दर एकरी तीन ते चार क्विंटलची घट झाली आहे. 
- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com