अडीच लाख कापसाच्या गाठींची निर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

जळगाव ः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असल्याने परदेशात कपाशीला मागणी असते. यंदा परदेशात कपाशीला जरी मागणी नसली तरी खानदेशात कापूस जिनिंग व्यावसायिकांनी आजअखेरपर्यंत सुमारे 2 लाख 50 हजार कापूस गाठींची निर्मिती केली आहे. गेल्या पंधरवड्यात कपाशीची आवक मंदावली होती. आता मात्र कपाशीच्या भाववाढीचे संकेत नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कपाशी बाजारात विकण्यास मोठ्या प्रमाणात सुरवात केली आहे. 

यंदा कपाशीचे उत्पादन कमी असल्याने चांगल्या दर केव्हा मिळेल, अशी प्रतीक्षा कापूस उत्पादक करीत आहे. मात्र, लग्नसराई व घरातील इतर कामांसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस काढला आहे. पंधरा दिवसांपूर्वी कपाशीला 5 हजार 800 चा दर होता. तो गेल्या आठवड्यात दोनशे रुपयांनी खाली आला. आता 5 हजार 600 चा दर आहे. असे असले तरी शेतकरी कापूस विकून मोकळा होत आहे. 
यंदा जिनिंग मिलमध्ये कापसाची आवक कमी होत असल्याने जिनिंग-प्रेसिंग मिल 80 टक्के बंद पडल्या आहेत. कापूस बाजारात होणाऱ्या उलाढालीवर याचा विपरीत परिणाम झाला आहे. जिनिंग व्यवसाय मंदीत आला आहे. 
 
साठवलेल्या कपाशीत बोंडअळीचा धोका 
ज्या ठिकाणी कपाशी साठविलेली आहे. अशा ठिकाणी कपाशीच्या बोंडात अळी असण्याचा धोका कृषी विभागाने वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अधिक महिने कापूस साठवू नये. साठविल्यास कपाशीत बोंडअळी निर्माण होऊन पुन्हा कपाशीचे नुकसान होईल. यामुळे शेतकऱ्यांनी एकतर कापूस विकावा किंवा फेरोमन (कामगंध) सापळे लावावेत, असा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात येत आहे. 
 
आतापर्यंत कपाशीची आवक तशी कमीच झालेली आहे. आतापर्यंत वीस- पंचवीस जिनिंग मिल सुरू आहेत. त्यातून अडीच लाख गाठींची निर्मिती झाली आहे. शेतकऱ्यांनी कपाशी विक्रीस आणल्यास व्यापारी कपाशीला 5 हजार 600 चा दर देत आहेत. 
- प्रदीप जैन, अध्यक्ष जिनिंग- प्रेसिंग मिल असोसिएशन 

Web Title: marathi news jalgaon cottan export