गुजरात, मध्यप्रदेशातून खानदेशात बी.टी. बियाणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

जळगाव ः कृषी विभागातर्फे 15 मे नंतर बी.टी.चे बियाणे उपलब्ध होणार असताना खानदेशात काही बागायतदार शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व कापूस पेरणीस सुरवात केल्याचे चित्र आहे. 
कपाशीचे बियाणे गुजरात, मध्यप्रदेशातून आल्याचा सांगितले जाते. मे महिन्याच्या सुरवातीस कापूस पेरल्यास अधिक उत्पन्न येईल या आशेने शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर ही पेरणी केली आहे. गुजरात, मध्यप्रदेशातून छुप्या मार्गे आणलेल्या या बियाण्यांबाबत कृषी विभागाने मात्र तोंडावर बोट ठेवले आहे. 

खानदेशातील कपाशीला परदेशातही अधिक मागणी आहे. खानदेशात सुरवातीपासूनच धूळ पेरणी केली जाते परंतु पावसाचे अंदाज चुकत असल्याने काही बागायतदार शेतकरी मे महिन्याच्या सुरवातीस मॉन्सूनपूर्व कपाशी लागवड करतात. गतवर्षी आलेल्या बोंडअळीमुळे कृषी विभागाने बी.टी.बियाणे पंधरा मे नंतर बाजारात विक्रीस येईल असे सांगितले. यामुळे सर्वसामान्य शेतकरी पंधरा मेची वाट पहात आहे. मात्र ज्यांच्या शेतात पाणी आहे, अशा शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व पेरण्यांना सुरवात केली आहे. त्यात मुख्यतः फागणे (जि. धुळे), पारोळा, एरंडोल, धरणगाव, जामनेर आदी ठिकाणाचा समावेश आहे. 
 
अधिक उत्पादनासाठी लवकर पेरण्या 
कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बियाणे उशिरा बाजारात आणले जाणार आहे. मात्र काही शेतकरी अधिक उत्पादन मिळण्यासाठी इतर राज्यातून बियाणे आणून पेरणी करीत आहे. कपाशीला योग्य भाव मिळत नाही. लवकर येणाऱ्या कपाशीला अधिक भाव मिळतो असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 
 
जिल्ह्यात धूळ पेरणी बंद झाली आहे. बी.टी.बियाणे पंधरा मे नंतर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल. मॉन्सूनपूर्व कपाशीची पेरणी झाल्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. शेतकऱ्यांनी अधिकृत वितरकांकडूनच पावती घेऊन बियाणे घ्यावे. बोगस बियाणे विक्रेत्यांवर आमची करडी नजर आहे 
-मधुकर चौधरी, मोहीम अधिकारी, कृषी विभाग
 
आकडे बोलतात... 
खरिपाचे क्षेत्र-- 8 लाख 34 हजार 450 हेक्‍टर 
कापसाचे संभाव्य क्षेत्र- 4 लाख 83 हजार हेक्‍टर 
कापूस बियाण्यांची मागणी-- 23 लाख 16 हजार 145 पाकिटे 
खतांची मागणी -- 3 लाख 40 हजार टन 

Web Title: marathi news jalgaon cotton b t seeds