जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनतर्फे कापूस खरेदीस सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 एप्रिल 2020

कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावीत यासाठी "सकाळ'ने पुढाकार घेत "व्यथा कापूस उत्पादकांची' अशी मालिका लावून धरली होती.

जळगाव/पारोळा : जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रावर आजपासून महाराष्ट्र राज्य को ऑपरेटिव्ह ग्रोवर्स मार्केटिंग फेडरेशनतर्फे कापूस खरेदीस सुरवात करण्यात आली आहे. पारोळा येथील ओम नमो शिवाय जिनिंग येथे खरेदी सुरवात करण्यात आली. 

हेपण वाचा - अगोदर दिली धमकी मग रात्री संधी साधत क्‍वारंटाईन केलेल्या युवकांनी केले भलतेच 

कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावीत यासाठी "सकाळ'ने पुढाकार घेत "व्यथा कापूस उत्पादकांची' अशी मालिका लावून धरली होती. त्या पार्श्‍वभूमीवर त्या पार्श्‍वभूमीवर धरणगाव, पारोळा, दळवेल (ता.पारोळा), कासोदा (ता.एरंडोल) याठिकाणी केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनचे झोनल मॅनेजर आर.जी.होले यांनी दिली. 

पारोळ्यात 3 केंद्रे 
पारोळा तालुक्‍यात ओम नमो शिवाय, बालाजी कोटेक्‍स व लक्ष्मी जिनिंग दळवेल अशी तीन खरेदी केंद्रे आहेत. त्यात आठवड्यातून तीन दिवस बालाजी कोटेक्‍स तर तीन दिवस लक्ष्मी जिनिंग दळवेल तर नियमितपणे ओम नमो शिवाय जिनिंग येथे कापूस खरेदी सुरू राहणार आहे. लॉकडाऊन काळात दररोज 20 गाड्यांची कापूस खरेदी ही एफ.ए.क्‍यू. दर्जा नुसार खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती ग्रेडर ठोसरे यांनी "सकाळ'ला दिली. 

'सीसीआय'चे अधिकारी गायब 
"सीसीआय'ने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. मात्र या कापूस खरेदीला "सीसीआय'चे अधिकारीच उत्सुक नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या नावाखाली खरेदी केंद्रात अधिकारी फिरकलेले नाहीत. आज अपवाद वगळता कुणी अधिकारी खरेदी केंद्रात उपस्थित नव्हता. यामुळे जेव्हा अधिकारी खरेदी केंद्रात येतील, तेव्हाच केंद्रधारक कारखानदार कापसावर प्रक्रिया, खरेदी, असे सोपस्कार पार पाडू शकतील, असे सांगण्यात आले. 

शेतकरी काय म्हणतात.. 
केंद्रे नियमित सुरूच हवी
 
दिगंबर वना पाटील (शेतकरी शेवगे बुद्रूक, ता.पारोळा) ः गेल्या अनेक दिवसापासून घरात कापूस पडून होता. मात्र खरीप हंगाम तोंडावर असताना केंद्रे बंद होती. "सकाळ'ने याबाबत वाचा फोडली. शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केल्याने समाधान आहे. ही खरेदी केंद्रे नियमित सुरू राहावीत हीच अपेक्षा. 

फिजिकल डिस्टन्स पाळून खरेदी 
दयाराम पाटील (संचालक, ओम नमो शिवाय जिनिंग, बोदर्डे शिवार, पारोळा) ः शासनाने कापूस खरेदीस परवानगी दिली आहे. त्यानुसार जिनिंगमध्ये शासनाच्या धोरणानुसार एफ.ए.क्‍यू.दर्जाचा कापूस खरेदी केला जाणार आहे. शासनाच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येते. कापूस फिजिकल डिस्टन्स पाळूनच खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे खरेदी प्रसंगी शेतकऱ्यांनी गर्दी करू नये. तोंडाला मास्क बांधावा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cotton kharedi marketing fedration open