कापसाच्या दरात दोनशे रुपयांची घसरण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

जळगाव ः कापसाच्या दरात दोनशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी दराबाबत धास्तावले आहेत. गेल्या आठवड्यात पाच हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल दर होता. तो आता पाच हजार पाचशे ते पाच हजार चारशे रुपयांपर्यंत मिळत आहे. दर वाढण्याऐवजी कमी होत असल्याने शेतकरी मात्र दरातील घसरणीने धास्तावले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील कापसाला मागणी नसल्याने दरात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजारपेठेत कापसाच्या कमी आवकेमुळे उलाढालीवर परिणाम झाला आहे. 

कापसाच्या दरात प्रतिक्विंटल दोनशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी बाजारात कापूस आणणे बंद केले आहे. केव्हा दरात वाढ होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. हे दर आठवडाभर स्थिर राहतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी वाढल्यास जिनिंगकडे कापसाच्या खंडींना मागणी येईल. खंडी तयार करण्यासाठी कापसाला मागणी होईल तेव्हा दरात वाढ होईल. 

शेतकऱ्यांनी हे उपाय करावेत 
शेतकऱ्यांनी साठवलेल्या कापसावर बोंडअळी न येण्यासाठी कामगंध सापळे लावावेत. अन्यथा आहे तो कापूस बोंडयुक्त झाला तर त्याला दर मिळणार नाही, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे. शक्‍यतोवर कापूस लवकरात लवकर विकावी; अन्यथा बाजारात जादा आवक होऊन कापसाला आता असलेले दर आणखी कोसळतील, अशी भीती व्यक्त होत आहे. 

कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे जिनिंग व्यावसायिकांना कपाशीच्या गाठींची निर्मिती करण्यात येत आहे. कापसाच्या कमतरतेमुळे अनेक जिनिंग यंदा सुरू झाल्या नाहीत. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणावा. जेणे करून कपाशी पिकाच्या क्षेत्रात उलाढाल वाढेल. 
- प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग-प्रेसिंग मिल असोसिएशन. 

Web Title: marathi news jalgaon cotton rate 200