बी. टी. बियाणे गोदामापर्यंत दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

जळगाव ः मॉन्सूनपूर्व कपाशी पेरण्यास काही शेतकऱ्यांनी सुरवात केल्याचे चित्र असताना, दुसरीकडे शासनातर्फे बी. टी. बियाणे जळगाव शहरातील गोदामापर्यंत पोचले आहे. वीस मेनंतर बियाणे विक्रीस उपलब्ध होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. एमआयडीसी परिसरातील गोदामात पोचलेले बियाणे विक्रेत्यांपर्यंत दाखल होण्यास पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागेल. नंतर विक्रीची परवानगी पुणे येथील कृृषी आयुक्तालयाचे आदेश आल्यानंतर होणार आहे. 

"नॉन बीटी मिक्‍स'चा दावा फोल 
गेल्या खरीप हंगामात राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. सोबतच जिनिंग प्रेसिंग व्यवसायातही तोटा आला आहे. यावर उपाय म्हणून आगामी खरीप हंगामात बीटी आणि नॉन बीटी बियाणे मिक्‍स करूनच देण्याची घोषणा कृषी विभागाने केली होती. मात्र बीटी त नॉन बीटी मिळविण्याचे काम बियाणे कंपन्या करू शकलेल्या नाहीत. यामुळे बोंडअळी हद्दपार होणार असल्याचा कृषी विभागाने केलेला दावा यंदा फोल ठरणार आहे. 

23 लाख पाकिटांची मागणी 
जिल्ह्यात यंदा सुमारे पावणेपाच लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड होणार आहे. तब्बल 95 टक्के क्षेत्र हे बीटी बियाण्याच्या लागवडीखाली होईल, असे गृहीत धरून कृषी विभागाने सुमारे 23 लाख 16 हजार 145 कापूस बियाणे पाकिटांची मागणी केली आहे. त्यापैकी राशी कंपनीची एक लाख 35 हजार पाकिटे आली आहे. इतर कंपन्यांची चाळीस हजार पाकिटे आली आहे. 

जिल्ह्यात बी. टी. बियाण्यांची पाकिटे गोदामापर्यंत दाखल झालेली आहे. ते विक्रीसाठी विक्रेत्यांपर्यंत पोचविणे व विक्रीबाबत पुणे कृषी आयुक्तालयाकडून अजून परवानगी आलेली नाही. परवानगी आली की लगेच विक्रीस सुरवात होईल. 

 मधुकर चौधरी  कृषी मोहीम अधिकारी. 

बी.टी.बियाण्यांची एक लाख पंच्याहत्तर पाकिटे दाखल झाली आहेत. 23 लाख पाकिटांची आपण मागणी केली होती. बीटीत नॉन बीटी मिक्‍स करणे कंपन्यांना शक्‍य झालेले नाही. यामुळे नॉन बी. टी. वेगळे घ्यावे लागणार आहे. वीस मेनंतर बियाणे विक्री सुरू होईल. 

विवेक सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. 
 
Web Title: marathi news jalgaon cotton seeds