...मी, "भाऊ'चा सांगून ठकबाजी ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

जळगाव : कुसुंबा (ता. जळगाव) येथील तरुणाला सरकारी नोकरीचे आमिष दाखवत नऊ लाखांत गंडविणाऱ्या एकनाथ आनंदा सोनवणे ऊर्फ छोटू (रा. केकत निंभोरा, ता. जामनेर) याला अटक करून आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयितास पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. आपण "भाऊंची' सर्व कामे करतो, म्हणून मंत्रालयात आपली बऱ्यापैकी वट (ओळख) असल्याचे सांगत छोटू ठकबाजी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. 

"रेमंड वस्त्रोद्योग'मधून निवृत्त झालेले मधुकर नारायण बाविस्कर (वय 60, रा. न्यू रायपूर कुसुंबा) येथे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांचा दहावी पास मुलगा महेश बाविस्कर याला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष देत मधुकर यांचा मामेभाऊ एकनाथ आनंदा सोनवणे ऊर्फ छोटू (रा. केकतनिंभोरा, ता. जामनेर) याने गंडवले होते. माझी आमदार, मंत्री आणि मोठ्या अधिकाऱ्यांशी मंत्रालयात ओळखी असल्याच्या भूलथापा देत एकनाथ सोनवणे (छोटू) याने मधुकर बाविस्कर यांच्याकडून (11 नोव्हेंबर 2014 ते 2017 पर्यंत) वेळोवेळी तगादा लावत टप्प्याटप्प्याने 9 लाख रुपये घेतले. पैशांसाठी तगादा लावल्यावर दोन वर्षानंतर छोटूने 3 लाख 40 हजार रुपये परत केले, मात्र उर्वरित 5 लाख 60 हजारांसाठी त्याने हात वर केले होते. मी, भाऊंचा माणूस आहे..माझे कुणी काहीच वाकडे करू शकत नाही अशा पद्धतीने तो धमकावत असल्याची माहिती आता तालुक्‍यातून येऊ लागली आहे. अटकेतील एकनाथ सोनवणे ऊर्फ छोटू याला पोलिसांनी न्या. अक्षी जैन यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयिताला 16 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले असून सरकारपक्षातर्फे ऍड. जी. एम. बारगजे यांनी कामकाज पाहिले. 

कोठडीत कबुलीची शक्‍यता 
आजवर एकनाथ सोनवणे ऊर्फ छोटू याने आजपर्यंत किती बेरोजगारांना गंडवले आहे याची माहिती पोलिस कोठडीतच मिळणार आहे. तसेच मधुकर बाविस्कर यांच्याकडून घेतलेल्या पाच लाखांचे संशयिताने नेमके काय केले, कोणाला दिलेत काय? याची माहिती मिळणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon crime job cash fasvanuk