कापूस लागवड क्षेत्र 30 हजार हेक्‍टरने वाढण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

जळगाव ः जिल्ह्यातील खरीप हंगामाचे यंदा लागवडीचे क्षेत्र साधारण 7 लाख 50 हजार 775 हेक्‍टरवर जाण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांचा वाढता कल लक्षात घेता कपाशीचे जिल्ह्यातील लागवड क्षेत्र 6 लाख 56 हजार 593 इतके असून, खरीप हंगामात यात 30 हजार 717 हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या पाठोपाठ मका लागवड 78 हजार 400 हेक्‍टरवर होण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. 

जळगाव ः जिल्ह्यातील खरीप हंगामाचे यंदा लागवडीचे क्षेत्र साधारण 7 लाख 50 हजार 775 हेक्‍टरवर जाण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांचा वाढता कल लक्षात घेता कपाशीचे जिल्ह्यातील लागवड क्षेत्र 6 लाख 56 हजार 593 इतके असून, खरीप हंगामात यात 30 हजार 717 हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या पाठोपाठ मका लागवड 78 हजार 400 हेक्‍टरवर होण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. 
जिल्ह्यात प्रामुख्याने 7 लाख 39 हजार 253 हेक्‍टर इतक्‍या क्षेत्रावर लागवड होत असते. यात यंदाच्या खरिपात क्षेत्रात वाढ होऊन 7 लाख 50 हजार 775 हेक्‍टर क्षेत्रातील सुमारे 4 लाख 87 हजार 310 हेक्‍टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्याअनुषंगाने उर्वरित 2 लाख 63 हजार 465 हेक्‍टर शेती क्षेत्रावर संकरित ज्वारीसह बाजरी, उडीद, मूग, मका, तीळ, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, संकरित बाजरी आदी पिकांची पेरणी होणार आहे. याकरिता बियाण्यांची देखील मागणी करण्यात आली आहे. 

कपाशीसाठी 11 हजार क्‍विंटलची मागणी 
कपाशी लागवडीखालील क्षेत्र व बियाण्याची गरज लक्षात घेऊन बीटी व नॉन बीटी प्रकारातील साधारण 10 हजार 964 क्‍विंटल अर्थात 24 ते 25 लाख पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. यात यंदाच्या हंगामात कमी कालावधीच्या कापूस लागवडीला प्राधान्य देण्यात आले होते. त्यानुसार आगामी खरीप हंगामासाठी 659 या बियाण्यांची मागणी अधिक असल्याची शक्‍यता आहे. 

खतांची मागणी 
पुढच्या खरीप हंगामासाठी निरनिराळे प्रकाराचे रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी गेल्या पाच वर्षातील खरीप हंगामात झालेल्या वापरावरून करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील एकूण खतांचा सरासरी वापर हा 2 लाख 95 हजार 277 मे. टन इतका असून, या वापरावरून 3 लाख 32हजार मे. टन इतक्‍या रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आल्याचे कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी सांगितले. 

प्रास्ताविक क्षेत्र व अपेक्षित बियाणे 
पीक.............. प्रस्तावित क्षेत्र (हेक्‍टर)........... अपेक्षित बियाणे (क्विंटल) 
संकरित ज्वारी..... 59 हजार 730................. 4 हजार 778 
संकरित बाजरी..... 15 हजार 410................. 462 
सुधारित बाजरी...... 1हजार 510................... 48 
तूर .................18 हजार 950................. 1 हजार 137 
मूग ................30 हजार 120................. 2 हजार 259 
उडीद ..............26 हजार 120................. 2 हजार 351 
मका ...............78 हजार 400................. 11 हजार 760 
सोयाबीन .........14 हजार 690.................. 7 हजार 161 
तीळ ...............1 हजार 450 ....................22 
भुईमूग.............2 हजार 50........................513 

Web Title: marathi news jalgaon cttone 30 thousand hecter