अंजली दमानियांच्या कथित कटाची चौकशी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 एप्रिल 2018

अंजली दमानियांच्या कथित कटाची चौकशी 

जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काही दिवसांपासून केलेले आरोप व गेल्या आठवड्यात कल्पना इनामदार यांनी दमानियांकडून लाच प्रकरणात अडकविण्याचे षडयंत्र रचल्याचा केलेला आरोप, यासंदर्भात मुंबई पोलिस आयुक्त अंतर्गत विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्या तक्रार अर्जाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी दमानियांच्या कथित कटाच्या चौकशीचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. 

श्री. खडसेंनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की गेल्या दोन वर्षांपासून अंजली दमानिया यांनी माझ्यासह कुटुंबीयांवर निराधार व खोटे आरोप करून बदनामी सुरू केली आहे. या आरोपांचे आपण वेळोवेळी जाहीरपणे खंडन केले. त्यांच्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य शासनाने केलेल्या चौकशीतून आढळून आलेले नाही. त्यानंतरही दमानियांकडून आरोपांचे सत्र सुरूच असून, विविध व्यक्तींना प्रलोभन दाखवून त्या आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

अलीकडेच कल्पना इमानदार यांनीही वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन त्यांना अंजली दमानिया यांनी "आपल्याला खडसेंना लाच प्रकरणात अडकवायचे आहे, काहीही करून त्यांच्या टेबलावर ठराविक रक्कम ठेवा' असा आग्रह केल्याचे जाहीर केले आहे. यासाठी दमानियांनी श्रीमती इनामदार यांना तीन तास समजावल्याचेही त्यांनी मुलाखतीतून सांगितले होते. 

हा प्रकार अत्यंत गंभीर असून, इनामदार यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे, हे तपासण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त यांच्या अधिकारात विशेष पोलिस तपास पथक स्थापन करून या प्रकरणाची शहानिशा करावी, अशी मागणी या पत्राद्वारे खडसेंनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या पत्राची तातडीने दखल घेत पोलिस प्रशासनास चौकशीसंबंधी निर्देश दिले आहेत. 
-------- 
कोट... 
दमानियांच्या संदर्भात कल्पना इनामदार यांनी गेल्याच आठवड्यात केलेल्या आरोपाची चौकशी करावी असे पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिले. त्यावरून त्यांनी आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 
- एकनाथ खडसे, माजी मंत्री. 
------------ 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon damaniya