बुक्‍का मोर्चाने देशद्रोहा विरोधात हुंकार! 

live photo
live photo

जळगाव ः देशभरात होत असल्याचे देशद्रोहाच्या कारवाया, तसेच दहशतवाद्यांना संरक्षण दिले जाते. देशातील काही विद्यापीठांमधून देशद्रोही व विघटनवादी शक्‍ती आणि जातीय तेढ निर्माण करण्याचे कार्य केले जाते. या देशद्रोहाच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बुक्‍का मोर्चा काढण्यात आला. यात विविध संघटना, विद्यार्थ्यांसह देशप्रेमी नागरीकांनी हुंकार भरला. 
श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय मंडळ, राष्ट्रीय सुरक्षा मंच तसेच देशप्रेमी नागरीकांच्यावतीने जळगावातून पहिला बुक्‍का मोर्चा काढण्यात आला. शहरातील बळीराम पेठेतील राजे शिवाजी चौक येथून सकाळी अकराला मोर्चाला सुरवात झाली. अलिगड मुस्लिम विद्यापीठ, जेएनयू व हैद्राबाद सेंटर विद्यापीांमध्ये दहशतवाद्यांच्या होणाऱ्या उदात्तीकरणाच्या प्रवृत्तीच्या विरोधात काढण्यात आलेला मोर्चा बळीराम पेठपासून टावर चौक, नेहरू चौक, कोर्ट चौक, स्वातंत्र चौक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यात शेकडो नागरीकांनी सहभागी होवून देशद्रोहाचा निषेध केला. मोर्चात आमदार सुरेश भोळे, महापौर सिमा भोळे, उपमहापौर अश्‍विन सोनवणे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, माजी उपमहापौर सुनील महाजन, महापालिकेचे गटनेते भगत बालाणी, नगरसेवक प्रशांत नाईक, भारती सोनवणे, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सचिन नारळे आदी उपस्थित होते. भारत सरकारच्या अनुदानावर चालणाऱ्या अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीत पाकिस्तानचे निर्माते महम्मद अली जिना यांचा फोटो लावला होता. तसेच सुरक्षा दलाच्या दलाच्या चकमकीत मारला गेलेला मन्नान वाणी यासारख्या दहशतवाद्याला श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला जातो. या कार्यक्रमात देखील भारतविरोधी घोषणा दिल्या जातात. अशा देशद्रोहा विरोधात "मुक नाही, थेट बुक्‍का मोर्चा' काढण्यात आला. यात नागरीकांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. "भारत करे बुलंद आवाज, आतंकवाद हो जायेगा मुर्दाबाद', "नक्षलवाद मुर्दाबाद' अशा घोषणा देण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com