देवगावची डॉ. मिनल पाटील राजन चित्रपटात मुख्य अभिनेत्री 

देवगावची डॉ. मिनल पाटील राजन चित्रपटात मुख्य अभिनेत्री 

पारोळा : देवगाव (ता. पारोळा) येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेली डॉक्‍टर असलेली तरुणी मिनल पाटील ही राजन या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार आहे. 
डॉ. मिनल पाटील यांचे अनपेक्षित व अभिनेत्रीचे अचानक रूप समोर आल्याने आश्‍चर्यचा धक्काच गावासह तालुकावासीयांना बसला आहे. तिच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 19 ऑक्‍टोबरला प्रदर्शित होण्याची दाट शक्‍यता आहे. परिणामी तिची भूमिका आणि चित्रपट विषयी तिच्या गावासह तालुक्‍यात उत्सुकता ही शिगेला पोचली आहे. मुख्य अभिनेत्रीच्या रूपात ही ग्रामीण तरुणी झळकणार असल्याने तिच्या आई वडिलांवर शुभेच्छांचा वर्षाव हा सुरू झाला आहे. 
देवगाव येथील शेतकरी वडील नितीन रमाकांत पाटील व जि. प. शाळेची शिक्षिका प्रतिभा पाटील सध्या राहणार आर. के. नगर पारोळा या दाम्पत्याची डॉ. मीनल पाटील ही मुलगी निर्माता सुरेखा वामन पाटील यांचा वंश एंटरप्राइझेस व दिग्दर्शन भरत श्रीपत सुनंदा यांचा राजन या मराठी चित्रपटातून मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 19 ऑक्‍टोबर 18 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे. मुबंई, गावासह आदी ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मराठीतील अनुभवी कलावंत राकेश बापट या चित्रपटाच्या मुख्य अभिनेता आहे. किशोरी शहाणे, गणेश खाडे, इक्‍बाल खान, अरुण नलावडे, सुहास पळशीकर, संजीवनी जाधव हे सह कलाकार आहेत. चित्रपटात रूपेश गोंधळी, योगेश चौधरी, मिनल सुर्वे, नितीन डोंगरे यांची गीते असून पार्श्‍वसंगीत अमर मोहिले छायांकन शेखर नगरकर सतीश सिस्टा यांचे आहे. 1993 च्या सुमारास मुंबईच्या मिल चाळ या बंद पडल्या. मिला बंद पडल्यामुळे कामगारांचा घरात उपासमारीची वेळ आली. त्यावेळी घराघरांतील तरुण मुले ही पैसे कमविण्यासाठी बाहेर पडली. मुंबईत त्यावेळी चित्रपटाचे आकर्षण मोठे होते. म्हणून चित्रपटाचे तिकिटे ब्लॅक करणे हा देखील प्रकार त्यावेळी होत होते. या ब्लॅकगीरीतुन त्या वेळी एरिया एरियात भाईगीरी अधिक उदयास आली. त्यातून राजन हा तरुण पुढारी पुढे आला. त्यावर आधारित व रोमांटीक प्रेमप्रकरण ही या चित्रपटाची साधारण कथेचा सार आहे. 

पार्श्‍वभूमी नसताना अभिनेत्री 
डॉ. मिनल पाटील ही शेतकरी कुटुंबातील तरुणी वडिलांची गावावर नऊ बिघा शेतजमीन काबाडकष्ट करणाऱ्या वडिलांना शिक्षिका आईचा हातभार, पहिली ते तिसरी मीनलचे शिक्षण हे देवगाव जि. प. शाळेत, चौथी ते दहावी श्री. बालाजी विदयाप्रबोधनी संचलित शाळा पारोळा या शाळेत अकरावी ते बारावी जयहिंद सीनियर कॉलेज धुळे येथे, सीईटीत चांगले गुण मिळाल्याने मेडीकलकडे वळली. पुणे येथील सुमिताबाई शहा मेडिकल कॉलेजात "बीएएमएस'चे शिक्षण गेल्या वर्षी पूर्ण झाले. माध्यमिक शाळेत असताना पारोळ्यात भारतनाटयमचा एका खासगी वर्गात सरावसह शाळा, महाविद्यालयात स्नेहसंमेलनात सहभाग, अकरावीत पहिल्यांदा अभिनेत्री होण्याचा व्यक्त केला होता मनोदय, परिस्थिती अभावी व घराची पार्श्‍वभूमी नसल्याने आईने दिला शिक्षणात सर्वाधिक वेळ देण्याचा सल्ला, पुण्यात "बीएएमएस'च्या तिसऱ्या वर्षाला असताना नाटकांचा प्रयोगाला केली होती सुरवात. नेव्हीत असलेल्या भावाचा बहिणीला अभिनेत्री होण्यासाठी प्रोत्साहन असून, शिक्षणात सुरवातीला डॉ. मीनल टॉपर आहे. 
दरम्यान कुठलेही सिनेकलावंताची पार्श्‍वभूमी नसताना डॉ. मीनल ही "राजन' या मराठी चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार असल्याने तालुक्‍यात आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच चित्रपट विषयी उत्सुकता ही शिगेला पोचली आहे. तिचा हा चित्रपट हाउसफुल्ल व सुपरहिट व्हावा, अशी अपेक्षा गावकरी करीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com