जळगावातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न : कॉंग्रेसचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

जळगाव ः शहरातील नागरी सुविधांवर भर देत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासोबत उद्योग व व्यापार वृद्धिंगत करण्याचा निर्धार कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून करण्यात आला आहे. तरुणांना रोजगाराबरोबरच महापालिका कर्मचाऱ्यांचाही विचार त्यातून केला असून हा जाहीरनामा प्रामाणिक असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. 
आज सायंकाळी कॉंग्रेस भवनातील एका छोटेखानी कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी, उदयसिंग पाटील यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. 

काय आहे जाहीरनाम्यात? 
शहरातील सर्व भागांत मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यावर भर, शिक्षण, आरोग्यासोबतच वाजवी मोबदल्यात शिक्षण व वैद्यकीय सेवेचा मानस, खुल्या जागांवर चांगली उद्याने विकसित करणे, प्रमुख चौक व बाजारपेठेत सीसीटीव्हीद्वारे सुरक्षेचे उपाय योजणे, माफक दरात शहर बससेवा सुरू करणे या नागरी सुविधांशी संबंधित बाबींचा समावेश आहे. तर कॉंग्रेसचे उमेदवार, त्यांचे स्वकीय महापालिकेत कोणत्याही पदावर लागणार नाहीत, कोणतेही मक्ते घेणार नाहीत, पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभार देऊ, अशी ग्वाही जाहीरनाम्यातून देण्यात आली आहे. 

सर्व घटकांचा समावेश 
तरुणांना अभ्यासिका, वाचनालये, रोजगार उपलब्ध होण्यासाठी उद्योग-व्यवसायांना पूरक वातावरण तयार करणे, महिला बचतगटांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना, सर्व व्यापारी संकुले व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे यावर भर देण्यात येईल. उद्योजकांकडून प्राप्त कराच्या मोबदल्यात नागरी सुविधा पुरविणे, व्यावसायिकांना त्रास होणारी अतिक्रमणे, हॉकर्सचे नियमानुसार स्थलांतर, महापालिका रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा, महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारणे यावरही जाहीरनाम्यातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित व्हावे यासाठीही नियोजन करण्याचे आश्‍वासन त्यातून देण्यात आले आहे. 

"सकाळ'ने विविध घटकांशी चर्चा करून तयार केलेला "जळगावकरांचा जाहीरनामा' आमच्यासाठी मार्गदर्शक ठरला. आम्ही स्वत: प्रामाणिकपणे अभ्यास करून हा जाहीरनामा बनविला असून तो "सकाळ'च्या जाहीरनाम्याचा आरसा आहे. 
- डॉ. राधेश्‍याम चौधरी 
 
Web Title: marathi news jalgaon devlepment congress