आरक्षणासाठी धनगर समाजातर्फे रास्ता रोको 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

जळगाव ः महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समितीतर्फे प्रलंबित मागण्यांसाठी आज (13 ऑगस्ट) राज्यभरात आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात जळगावात महामार्गावरील इच्छादेवी चौक येथे सकाळी अकराला रास्ता रोको आंदोलन केले. 

धनगर समाज संघर्ष समितीतर्फे मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना यापुर्वीच निवेदन देण्यात आले होते. यात 12 ऑगस्टपर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास 13 ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी अकराला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम केल्यानंतर शहरातील इच्छादेवी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धुळे येथे देखील समाजाच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

महासंघातर्फे धरणे 
महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी त्वरित करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. आंदोलनाच्या ठिकाणी समाज बांधवांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. 

Web Title: marathi news jalgaon dhangar samaj rasta roko