संविधानाची प्रस्तावना सहा भाषांत तोंडपाठ! 

dhara medhe
dhara medhe

जळगाव ः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधान एक- दोन नाही, तर सहा भाषांमध्ये तोंडपाठ. मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्लिश, उर्दू व गुजराती अशा सहा भाषांमधील संविधान तिसरीतील विद्याथिनी धारा मेढेच्या तोंडपाठ आहे. तिच्या या कामगिरीचा समावेश "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये होणार आहे. 
शहरातील भा. का. लाठी विद्यामंदिरातील धारा प्रशांत मेढे ही वयाच्या तिसऱ्या वर्षापासून संविधान म्हणते. बालवाडीत असताना धारा हिने दोन ते तीन वेळा संविधान प्रास्ताविक मराठीमध्ये इतर विद्यार्थ्यांकडून ऐकले व तिने घरी आल्यानंतर तिच्या आईला ते म्हणून दाखविले. तिच्या वडिलांना ही बाब कळली असता, त्यांनी ती प्रत घरी आणली आणि धाराने ती प्रत न बघता संविधान तोंडपाठ म्हणून दाखविले. हे लक्षात घेता तिने अनेक भाषांत संविधान म्हणावे, यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिची तयारी सुरू केली. गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, गुरुस्मरण याची तिला आवड आहे. उपजतच सात्विकतेची आवड असलेली धाराची शाळेतील प्रगती व गुणवत्ता यांचा विचार करता तिला अभ्यासात खूपच रुची असून, ती नियमित अभ्यास करूनच मग खेळते. 

दहा भाषांत संविधान 
धाराचा अभ्यासाचा ओढा व पाठांतराची आकलनक्षमता लक्षात घेता, तिच्या आई- वडिलांनी वयाच्या दहा वर्षापर्यंत दहा भाषांत संविधान तोंडपाठ झाले पाहिजे, असे ठरविले. योगायोग असा, की धाराची जन्मतारीख 10 फेब्रुवारी 2010 असल्याचे लक्षात घेता, तिची तयारी सुरू झाली. धाराचे मराठीत संविधान तोंडपाठ झालेले असल्याने संस्कृत आणि हिंदी या भाषांत पाठांतर करण्याचे ठरले. हिंदीचे पाठ करून घेतले. पण, संस्कृत भाषेत उच्चार काढण्यात अडचण येत होती. ही अडचण लक्षात घेता आर. आर. विद्यालयातील संस्कृत शिक्षक द्वारकाधीश जोशी यांनी धाराला संस्कृतमधील उच्चार शिकवले. यानंतर तिच्या आई- वडिलांनी घरीच तिच्याकडून इंग्लिश, गुजराती, उर्दू या भाषांत संविधान तोंडपाठ करून घेतले. सहा भाषा झाल्या असून, सध्या ती पंजाबी व तमीळ भाषेचा सराव करीत आहे. पुढे आणखी इतर भाषांत संविधान तोंडपाठ करण्याचा तिचा मानस आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com