डीएचओ डॉ. कमलापूरकर यांची चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

जळगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्‍यक औषधी खरेदी करण्याच्या प्रक्रियेत घोळ करून गैरव्यवहार केल्याचा ठपका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. यासह अन्य काही आरोप देखील डॉ. कमलापूरकर यांच्यावर झाले असून, याबाबत विधिमंडळात देखील प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर आज (ता. 27) डॉ. कमलापूरकर यांची आरोग्य उपसंचालकांकडून समिती पाठवून जाबजबाब घेण्यात आले आहेत. 

जळगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्‍यक औषधी खरेदी करण्याच्या प्रक्रियेत घोळ करून गैरव्यवहार केल्याचा ठपका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. यासह अन्य काही आरोप देखील डॉ. कमलापूरकर यांच्यावर झाले असून, याबाबत विधिमंडळात देखील प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर आज (ता. 27) डॉ. कमलापूरकर यांची आरोग्य उपसंचालकांकडून समिती पाठवून जाबजबाब घेण्यात आले आहेत. 

जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांच्या कामांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ताशेरे ओढून औषधी खरेदीमध्ये आणि टेंडर प्रक्रियेत घोळ केला असल्याचे आरोप करण्यात आले होते. शिवाय पावसाळी अधिवेशनात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तसेच अन्य वैद्यकीय देयकांच्या प्रतिपूर्तीबाबत तसेच साहित्य खरेदीसंदर्भात झालेल्या गैरप्रकार केल्याचा मुद्दा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधिमंडळात उपस्थित करत डॉ. कमलापूरकर यांची मंत्रालय स्तरावरून चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. 

तीन सदस्यीय समितीकडून चौकशी 
जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याविरोधात साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण गाजत आहे. अन्य कारणावरूनही जिल्हा आरोग्य अधिकारी चर्चेत असून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांना एकतर्फी कार्यमुक्‍त करण्याचा ठराव सभेत करण्यात आला होता. हा ठराव विभागीय आयुक्‍तांकडे पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित झाल्याने आरोग्य उपसंचालक यांच्याकडून तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. ही समिती आज जळगावात येऊन डीएचओ डॉ. कमलापूरकर यांची चौकशी केली. 

कर्मचाऱ्यांचे घेतले जबाब 
डॉ. कमलापूरकर या औषधी खरेदी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या असून, विधिमंडळात उपस्थित प्रश्‍नावरून आरोग्य उपसंचालक यांच्याकडून चौकशी समिती नेमली. ही समिती आज जिल्हा परिषदेत येऊन डॉ. कमलापूरकर यांची चौकशी केली. समितीने डॉ. कमलापूरकर यांच्यावर झालेल्या आरोपांबाबतचे संपूर्ण चौकशी करून कागदपत्र ताब्यात घेतले आहे. शिवाय आरोग्य विभागातील कर्मचारी आणि तालुकास्तरावरील आरोग्य अधिकाऱ्यांचे देखील यावेळी जबाब घेण्यात आले आहेत. हा चौकशी अहवाल दोन दिवसात आरोग्य संचालकांमार्फत मंत्रालयात सादर करण्यात येणार असल्याचे समिती अध्यक्षांनी सांगितले."या प्रकरणात चौकशी झाल्यामुळे यातील सत्य समोर येईल. यामुळे समाधानी असल्याचे डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Dho inqury