विद्यापीठ देणार यंदापासून प्रा. पौ सुवर्णपदक 

जगन्नाथ पाटील
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

कापडणे : कविवर्य बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील वनस्पतीशास्त्र विषयाच्या बारा प्राध्यापकांनी आज दोन लाख रुपये देणगी विद्यापीठाकडे सुपूर्द केली. या देणगीच्या व्याजातून प्रथम वर्ष एम. एस्सी.ला विद्यापीठात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला सुवर्णपदक दिले जाईल. अलीकडेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे "कविवर्य बहिणाबाई चौधरी' असे नामकरण केले गेले. त्या अनुषंगाने प्रेरित होऊन बारा प्राध्यापकांनी या विधायक उपक्रमाचा पायंडा सुरू केला असल्याची माहिती प्राचार्य एम. व्ही. पाटील यांनी दिली. 

एम. एस्सी. वनस्पतीशास्त्र या विषयात यंदापासून विद्यापीठातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस प्रा. आर. एम. पौ सुवर्णपदक दिले जाईल. यासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर, प्रा. ए. बी. चौधरी, डॉ. डी. ए. पाटील, डॉ. अजय पाटील, डॉ. वाय. ए. अहिरराव, प्राचार्य एम. व्ही. पाटील, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शुभांगी पवार, डॉ. एस. के. तायडे, डॉ. एस. बी. खौरनार, डॉ. सी. आर. पाटील, डॉ. एस. आर. क्षीरसागर आदी उपस्थित होते. 

लाखमोलाचे बारा प्राध्यापक 
वनस्पतीशास्त्राचे मार्गदर्शक आणि गुरुस्थानी असलेल्या प्रा. पौ यांच्या नावाने सुवर्णपदक दिले जावे, यासाठी दोन लाख रुपये देणगी देणारे प्राध्यापक असे ः डॉ. डी. ए. पाटील, डॉ. अजय पाटील, डॉ. वाय. ए. अहिरराव, प्राचार्य एम. व्ही. पाटील, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शुभांगी पवार, डॉ. एस. के. तायडे, डॉ. एस. बी. खैरनार, डॉ. सी. आर. पाटील, डॉ. एस. आर. क्षीरसागर, एच. बी. शिसोदे व प्रा. हेमंत ठाकूर. 

प्रा. पौ सन्मान सुवर्णपदक 
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वनस्पतीशास्त्रज्ञ असा लौकिक असलेले प्रा. आर. एम. पौ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विभागप्रमुख होते. इंडियन सायन्स कॉंग्रेस आणि इंडियन बॉटनिकल सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. प्रा. पौ यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील येथील डॉ. डी. ए. पाटील यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केली. डॉ. पाटील व त्यांचे सहसंशोधक प्राध्यापक प्रा. पौ सन्मान सुवर्णपदक पारितोषिकाचा प्रारंभ करीत आहेत.

Web Title: marathi news jalgaon dhule univercity gold medal