दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करणारा H2O चित्रपट 

अमोल कासार
गुरुवार, 11 एप्रिल 2019

जळगाव : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, त्यातच ग्रामीण भागातील व शहरी भागात होणारा पाणीपुरवठा यांमध्ये असलेली तफावत या सर्व परिस्थितीत तरुणांची पाण्यासाठी चळवळ यावर भाष्य करण्यासाठी मिलिंद पाटील यांनी स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन सत्य परिस्थिती मांडण्यासाठी H2O (एचटूओ) या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात 20 स्थानिक कलाकार आहेत. 

जळगाव : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, त्यातच ग्रामीण भागातील व शहरी भागात होणारा पाणीपुरवठा यांमध्ये असलेली तफावत या सर्व परिस्थितीत तरुणांची पाण्यासाठी चळवळ यावर भाष्य करण्यासाठी मिलिंद पाटील यांनी स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन सत्य परिस्थिती मांडण्यासाठी H2O (एचटूओ) या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात 20 स्थानिक कलाकार आहेत. 

राज्यातील बहुतांश गावांमध्ये बारमाही दुष्काळी परिस्थिती असते. गावातील परिस्थिती आणि शहरातील परिस्थिती त्याठिकणी राहणाऱ्या युवा वर्गातील विचार दिग्दर्शक मिलिंद पाटील यांनी हे चित्रपटातून मांडले आहे. आज ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती तर शहरी भागात नागरिकांना एक दिवस उशिराने पाणीपुरवठा झाल्यास त्यांच्याकडून पाण्यावर असलेला हक्क सांगितला जातो. दुष्काळी परिस्थिती बदलविण्यासाठी शहरासह गावातील मुलांचा कॉलेजमध्ये दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी युवकांमध्ये चळवळ कशी तयार होते. तसेच गावातील राजकारणामुळे शासकीय योजना असून देखील या परिस्थितीवर मात होत नाही. हे दृष्य कलाकारांनी अत्यंत हुबेहूब मांडले आहे. 

जिल्ह्यातच शूटिंग 
चित्रपटाचे शूटिंग हे जळगाव तालुक्‍यातील धारशिरी, सावदा तालुक्‍यातील रिंगणगाव यासह मू. जे. महाविद्यालयात झाले आहे. कलाकारांनी एक दिवस देखील शुटींगमध्ये खंड न पाडता महिनाभर या चित्रपटाचे शूटिंग केले. तसेच या चित्रपटातील गाणे हे अलिबाग, रायपूर येथे शूट करण्यात आले आहे. 

20 कलाकार जळगावातील 
एचटूओ चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद पाटील, निर्माते सुनील झंवर यांच्यासह उपनायिकेच्या भूमिकेत किरण पाटील व कुश पवार, प्रीतम सोनवणे, अक्षय नेहे, रूपेश जैस्वाल यांच्यासह 20 कलाकारांनी भूमिका साकारली आहे. 

उपनायिकेच्या भूमिकेत किरण पाटील 
चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका अशोक ढगे, नायिका शीतल अहिरराव यांनी केले आहे. उपनायिका म्हणून किरण पाटील यांनी तर खलनायक म्हणून सुप्रित निकम, धनंजय धुमाळ या भूमिकेत आहेत. किरण पाटील हिने चॅनेलवर 'साथ दे तू मला', लाकडी घाणा, मल्ल्याळम भाषेतील इस्त्रा, मराठी भाषेतील 'बस स्टॉप', 'जाऊ द्या बाळासाहेब' या चित्रपटासह 'घाडगे आणि सून' या मालिकेसह अनेक ट्रोल, शॉर्ट फिल्म, एकांकिकांमध्ये मराठी सिनेअभिनेता अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, पूजा सावंत, सिद्‌धार्थ चाफेकर या कलाकांसोबत भूमिका साकारलेल्या आहेत. 

एकाचवेळी 150 टॉकीजमध्ये प्रदर्शित 
एचटूओ चित्रपट हा 12 एप्रिलला राज्यभरात 150 चित्रपटगृहांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांची आत्महत्या यासह अनेक ज्वलंत विषयावर त्यांनी भूमिका साकारलेली आहे. 

राज्यातील दुष्काळी परिस्थिती हा अत्यंत ज्वलंत विषय आहे यावर स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन चित्रपटाची निर्मिती केली. इतर कलाकारांपेक्षा स्थानिक कलाकारांनी अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने काम केले असल्याने त्यांना हे व्यासपीठ मिळाले आहे. 
मिलिंद पाटील, दिग्दर्शक 

आतापर्यंत अनेक चित्रपटांसह मालिकांमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. पहिल्यांदाच चित्रपटात सहाय्यक नायिकेची भूमिका करण्याची संधी मिळाली. दुष्काळावर भाष्य करणारा हा चित्रपट असून प्रत्येक तरुणाने हा चित्रपट नक्की बघावा. 
-किरण पाटील, उपनायिका 

Web Title: marathi news jalgaon dhuskal H2O cinema