महाराष्ट्र दिनापासून मिळणार "डिजिटल' सातबारा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

जळगाव ः जिल्हा प्रशासनातर्फे सात-बारा संगणकीकरणाचे काम 97 टक्के पूर्ण झाले आहे. काही गावांचे कामे अपूर्ण आहे. तेही पुढील महिन्यात होईल या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची सुरू केली आहे. एक मेपासून राज्यात सात-बारा उतारे डिजिटल स्वाक्षरीने मिळतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच मुंबईत केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वरील माहिती दिली. 

गेल्या दोन वर्षापासून राज्यभरात सात-बारा संगणकीकरणाचे कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी सातबाराचे संगणकीकरणात विविध अडचणी आल्या. अगोदर संगणकीकरणाचे सर्व्हर कमी स्पीडचे होते. एक एक सातबारा संगणकीकरणास अर्धातास लागत होता. इडीट मॉडेलमध्ये काम करताना वेळ लागत होता. ही तांत्रिक बाब लक्षात न घेता जिल्हा प्रशासन तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना जबाबदार धरीत होती. तरीही तलाठ्यांनी कामे केली. संगणकीकरणाच्या कामात जिल्हा मागे असल्याने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी चार प्रांताधिकारी, अकरा तहसिलदारांवर कारवाई करीत त्यांचे वेतन वाढ थांबविण्याबाबत विभागीय आयुक्‍तांना प्रस्ताव पाठविला होता. आज अखेर जिल्ह्यात सात-बारा संगणकीकरणाचे 96.60 टक्के काम पूर्ण झाले. एकूण 1 हजार 502 गावांपैकी 1 हजार 451 गावातील सात-बारा संगणकीकरण पूर्ण झाले. 

पाच तालुक्‍यांत 100 टक्के काम 
एरंडोल, बोदवड, भडगाव, यावल, रावेर या पाच तालुक्‍यात संगणकीकरणाचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. चोपडा, चाळीसगाव तालुक्‍याचे काम 99 टक्के पूर्ण आहे.

Web Title: marathi news jalgaon digital utara