रखडलेल्या चौपदरीकरणावरुन अधिकारी धारे0वर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

जळगाव ः तरसोद ते फागणे दरम्यानच्या महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या अनेक महिन्यापासून रखडले आहे. महामार्गाचा रस्ता अरुंद असून, त्यात खड्डे पडल्याने दर दिवशी अपघात होऊन कोणाचा तरी मृत्यू होतो. तुम्हाला या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू करण्याचे काम तीन महिन्यापूर्वी सांगितले होते. अद्यापही ते सुरू झालेले नाही. अपघातात जो मृत होतो, त्याच्या घरची परिस्थिती भयंकर होते. त्याच्या घरी जाऊन पहा. म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीच्या जीवनाचे मोल कळेल, अशा शब्दात खासदार उन्मेष पाटील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी करीत धारेवर धरले. 

जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे होत्या. त्यावेळी खासदार पाटील बोलत होते. यावेळी केंद्र शासनाच्या तब्बल 27 योजनांचा आढावा घेण्यात आला. तब्बल चार तास ही बैठक चालली. 
"सकाळ'ने आज तरसोद ते फागणे महामार्ग, जळगाव औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणाचे विषय प्रसिद्ध केला होता. त्या अनुषंगाने खासदार व लोकप्रतिनिधींनी आज "नही'च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्वरित काम सुरू करा अन्यथा कंत्राटदारावर कारवाई करून दुसरा नेमा अशा सूचना केल्या. 

मुख्यमंत्री माणूस आम्ही नाही का ? 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्त "नही'च्या अधिकाऱ्यांनी धुळे ते जळगाव महामार्गावरील खड्‌डे तात्पुरते बुजवून चांगला रस्ता केला होता. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच त्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे अनेक नागरिकांनी खासदार, आमदारांना महामार्गाच्या दुर्दशेविषयी जाब विचारला. मुख्यमंत्री येतात तेव्हाच रस्ते दुरुस्त होतात. ते माणूस आहे आम्ही माणूस नाही का? अशी विचारणा नागरिक करतात असे सभेत सांगत "नही'च्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. साईडपट्टया न भरल्याने अपघात होतात. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले ते बुजविण्याचे आदेश देण्यात आले. 

शहराव्यतिरिक्त मार्गासाठी नवीन "डीपीआर' 
जळगाव शहरात कालिंका माता मंदिर ते खोटेनगरपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र वाहतूक खोटेनगर पासून पाळधीपर्यंत अधिक आहे. यामुळे शहरातील चौपदरीकरणानंतर जो रस्ते आहे तो (खोटेनगर ते पाळधी बायपास, कालिकामाता मंदिर ते तरसोद बायपास) यारस्त्याचेही चौपदरीकरण करावे. त्यासाठी नवीन डीपीआर' तयार करावा. त्यात वाढीव मार्गासह पिंप्राळा पूल व गिरणा नदीवरील पुलाला समांतर पूल तयार करण्याचाही समावेश करावा, अशा सूचना "नही'च्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon disha baithak 4 way road Nhai