जिल्ह्यातील पतसंस्थांचे साडेपाचशे कोटी थकीत 

जिल्ह्यातील पतसंस्थांचे साडेपाचशे कोटी थकीत 

जळगाव : जिल्ह्यातील सुमारे 25 लाख कर्जदारांकडे 525 कोटींची थकबाकी असून कलम 88 अन्वये 42 पतसंस्थांची चौकशी पूर्ण झाली आहे. आत्तापर्यंत 907 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर 351 कोटी 88 लाख रुपयांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

पतसंस्थाचालकांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील अनेक पतसंस्था अडचणीत आल्या. त्यामुळे हजारो ठेवीदारांच्या ठेवी असुरक्षित बनल्या असून पतसंस्था बुडल्याने अनेकांच्या ठेवीही बुडल्यात जमा आहेत. शासनाने त्यावेळी अर्थसाहाय्य करून ठेवीदारांना त्यांचा पैसा परत करण्याचा व पतसंस्था अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील जवळपास 178 पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. 

105 संस्था अद्यापही अडचणीत 
आतापर्यंत 73 पतसंस्था अडचणीतून बाहेर पडल्या असून 105 पतसंस्था अद्यापपर्यंत अडचणीत आहे. जिल्ह्यात 1 कोटी 73 लाख कर्जदारांकडे 1054कोटी 82 लाख रुपयांची थकबाकी होती. त्यापैकी 1 लाख 48 हजार कर्जदारांकडून 535 कोटी 79 लाख रुपयांची वसुली करण्यात आली. तरीही 25 लाख कर्जदारांकडे 525 कोटींची थकबाकी आहे. 

आठ हजारांपेक्षा जास्त मालमत्तांवर बोजे 
जिल्ह्यातील थकबाकीदारांकडून कर्जवसुली करण्यासाठी सहकार विभागामार्फत मालमत्तांवर बोजे देखिल बसविण्यात आले. 8हजार 355 प्रकरणांमध्ये 8हजार 523 मालमत्तांवर बोजे बसविण्यात आले आहे. यातील काही मालमत्तांचा लिलावही करण्यात आला आहे. 

528 कोटी देणे बाकी 
जिल्ह्यातील 5लाख 97हजार ठेवीदारांपैकी 3 लाख 63हजार ठेवीदारांना 502 कोटींचे वाटप करण्यात आले आहे. आता 2 लाख 33हजार ठेवीदारांना 528 कोटी रुपये देणे बाकी आहे. जिल्ह्यातील 37पतसंस्थांवर प्रशासक तर आठ संस्थांवर अवसायक नियुक्त करण्यात आले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com