मध्य रेल्वेद्वारे दिवाळीनिमित्त विशेष 24 गाड्या धावणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

भुसावळ : प्रवाशांची गर्दी पाहता दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेद्वारे लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर /मंडुआडीह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जम्मूतावी/लखनौ दरम्यान चोवीस विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासर्व गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत. 

भुसावळ : प्रवाशांची गर्दी पाहता दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेद्वारे लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर /मंडुआडीह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जम्मूतावी/लखनौ दरम्यान चोवीस विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासर्व गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत. 

लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक विशेष गाडी तीन नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी मध्यरात्री पाऊणला लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल. दुसऱ्या दिवशी 11.35 ला गोरखपूर पोहोचेल. हीच विशेष गाडी परतीच्या प्रवासाला चार नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक रविवारी दुपारी दोनला गोरखपूरहून निघेल. तिसऱ्या दिवशी 00.35 ला लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी मार्गात कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, छियोंकी, वाराणसी, मऊ, भटनी व देवरिया सदर येथे थांबेल. 

लोकमान्य तिलक टर्मिनस-मंडुआडीह साप्ताहिक विशेष गाडी सात नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक बुधवारी मध्यरात्री पाऊणला लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघेल. दुसऱ्या दिवशी 4.45 ला मंडुआडीहला पोहोचेल. ही गाडी परतीच्या प्रवासाला आठ नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी दुपारी दोनला मंडुआडीहहून निघेल. ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, छियोंकी, वाराणसी, मऊ, भटनी, तथा देवरिया सदर येथे थांबेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जम्मू तवी एसी सुपरफास्ट : ही गाडी दोन नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी 06.45 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री आठला जम्मू तावी येथे पोहोचेल. 
या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाल, झॉंसी, आगरा कैंट, दिल्ली सफदरगंज, अंबाला कैंट, लुधियाना जं, जालंधर कैंट, तथा पठाणकोट कैंट येथे थांबा दिला आहे. जम्मूतावी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडी चार ते 18नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक रविवारी सकाळी सातला जम्मूहून सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-लखनौ एसी सुपरफास्ट गाडी सहा नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक मंगळवारी दुपारी 2.20 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटेल. तसेच लखनौ-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एसी सुपरफास्ट साप्ताहिक गाडी सात नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान दुपारी तीनला लखनाहून सुटणार आहे. 

Web Title: marathi news jalgaon diwali frstiwal madhya railway spacial train