दिवाळीसाठी ऑनलाइन खरेदीची धूम 

दिवाळीसाठी ऑनलाइन खरेदीची धूम 

जळगाव : दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत ऑनलाइन शॉपिंगवर विविध सवलतींची सुरू असल्याने ग्राहकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

ऑनलाइन विक्री संकेतस्थळांकडून ग्राहकांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सणासुदीच्या हंगामात घरच्या घरी सुलभ खरेदी करता येत असल्याने ऑनलाइन खरेदीमध्ये गेल्या वर्षापासून वाढ होत आहे. अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे कपडे, शृंगाराचे सामान, दागिने, भेटवस्तू, पादत्राणे अशा अनेक वस्तू ऑनलाइन विक्री संकेतस्थळांवरून खरेदी केल्या जात आहे. खरेदी केलेल्या वस्तू चार ते पाच दिवसांतच ग्राहकांना घरपोच मिळत असल्याने ग्राहक ऑनलाइन खरेदीला पसंती देत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 
 
मोबाईलला अधिक पसंती 
भरभरून मिळत असलेल्या सवलतींबरोबरच इंधनांच्या वाढलेल्या किमती आणि खरेदीसाठी असलेल्या असंख्य पर्यायांमुळे ऑनलाइन खरेदीचा कल वाढत आहे. भेटवस्तू, इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्‌स, कपड्यांच्या ऍक्‍सेसरीज, तयार कपडे, गृहोपयोगी वस्तू, संगणक, खेळणी, दागिने, सौंदर्य उत्पादने, आरोग्य उत्पादने आदींची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. यात सर्वाधिक विक्री ही मोबाईलची होत असून यावर सुमारे 40 टक्‍यांपर्यंतच्या सवलती दिल्या जात आहे. 
 
तरुणाईकडून मागणी 
सध्या मोबाईल व इंटरनेटमुळे तरुणाईला वेड लावले आहे. दिवसातील अधिक वेळ तरुणाई ही इंटरनेटवर व्यस्त असते त्यामुळे ऑनलाइन खरेदीमध्ये देखील तरुणाईचा पुढाकार अधिक आहे. दिवाळीसाठी नवीन व हटके वस्तू खरेदीकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com