डॉक्‍टर होण्याच्या स्वप्नांना आर्या फाउंडेशनचे बळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जळगाव : डॉक्‍टर होण्याचे स्वप्न उराशी होते. नीट परीक्षाही उत्तीर्ण; पण घरातील आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने पुढच्या शिक्षणाला अळथळा होता. मिलनच्या या स्वप्नाला आर्या फाउंडेशनचा हात मिळाला. यामुळेच मिलन आपले स्वप्न साकार करू शकत आहे. 
शहरातील पांडे डेअरी चौक येथे मिलन पोपटाणी याचे कुटुंब आहे. आई शिवणकाम आणि 

जळगाव : डॉक्‍टर होण्याचे स्वप्न उराशी होते. नीट परीक्षाही उत्तीर्ण; पण घरातील आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने पुढच्या शिक्षणाला अळथळा होता. मिलनच्या या स्वप्नाला आर्या फाउंडेशनचा हात मिळाला. यामुळेच मिलन आपले स्वप्न साकार करू शकत आहे. 
शहरातील पांडे डेअरी चौक येथे मिलन पोपटाणी याचे कुटुंब आहे. आई शिवणकाम आणि 
ब्युटीपार्लरचा छोटा व्यवसाय करून घर चालविते. तर वडील वेळेनुसार छोटी-मोठी कामे करून संसाराचा रहाटगाडा ओढतात. कुटुंबातील विजिगीशु वृत्तीचा मुलगा डॉक्‍टर होण्याच्या जिद्दीने नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून गेल्या वर्षी उत्तीर्ण झाला. परंतु, एमबीबीएसच्या शिक्षणासाठी प्रवेश शुल्क अडथळा ठरत असल्याने शहरातील नेत्रतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी आर्या फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणासाठी मिलनला दत्तक घेतले. त्यासाठी प्रथम वर्षाचे शिक्षण शुल्क 78 हजार रुपये गेल्या वर्षी मदत म्हणून फाउंडेशनकडून दिले. त्यामुळे आज मिलन पोपटाणी हा नायर हॉस्पिटल मुंबईमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. 

मिलनचे पहिल्या वर्षी यश 
डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या प्रयत्नांनी आर्या फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक आणि मानसिक मदतीचे चीज करीत मीलन हा प्रथम वर्ष एमबीबीएसमध्ये 76.33 टक्के गुण मिळवत महाविद्यालयात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. 

दुसऱ्या वर्षीही मदत 
एमबीबीएसच्या द्वितीय वर्षासाठी आवश्‍यक असलेले शुल्क एक लाख तीस हजार दोनशे रुपये भरणे पुन्हा अडथळा होऊ पाहत होते. डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी मित्रपरिवरात मदतीसाठी चर्चा केले असता शहरातील एका नामांकित डॉक्‍टरने पुढे येत नाव जाहीर न करण्याच्या अटीवर फाउंडेशनला एक लाख तीस हजार दोनशे रुपयांची मदत पोहोचवली आहे. या रकमेचा धनादेश फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, संचालक डॉ. राहुल महाजन, संचालक डॉ. प्रशांत देशमुख यांनी घरी जाऊन मिलनच्या आई- वडिलांकडे सुपूर्द केला. पुढील वर्षी देखील मिलनच्या शैक्षणिक शुल्काची जबाबदारी आर्या फाउंडेशन उचलेल, असे डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले. 

आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू 
मिलनला आर्या फाउंडेशनची होत असलेली मदत आणि मुलाचे यश पाहून धनादेश स्वीकारताना आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. शहरातील डॉक्‍टरांसह व्यापारी, उद्योजक, वकील, इंजिनिअर यांनीही पुढे येत आर्या फाउंडेशनच्या या सामाजिक कार्यात मदतीचा हात द्यावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon docter aarya foundetion help