महापालिका "डीआरएटी'त पुन्हा याचिका दाखल करणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

जळगाव ः हुडको कर्जप्रकरणी डिक्री नोटिशीच्या स्थगितीबाबत महापालिकेची बाजू मांडली गेली नसल्याने ही याचिका "डीआरएटी'ने फेटाळली. त्यामुळे तीस दिवसांच्या आत अपील करणे आवश्‍यक असल्याने महापालिका प्रशासनाने आज याचिका दाखल करण्यासंदर्भात एका तज्ज्ञ वकिलाची नियुक्ती केली असून, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार याचा पाठपुरावा करणार आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन पुन्हा "डीआरएटी'त पूर्णसंचयन अर्ज (रिस्टोरेशन) नुसार याचिका दाखल करणार आहे. 

"हुडको'कडून तत्कालीन नगरपालिकेने विविध योजनांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने "डीआरएटी'ने महापालिकेला 341 कोटींची डिक्री नोटीस बजावली होती. तसेच 50 दिवस महापालिकेची सर्व बॅंक खाती गोठावली होती. याबाबत महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयात धाव घेत हुडकोने दिलेल्या डिक्री नोटिशीवर स्थगिती मिळविली. याबाबत "डीआरएटी' प्राधिकरणाकडे महापालिकेकडून डिक्री नोटीसबाबत याचिका दाखल केलेली होती. या याचिकेसंदर्भात महापालिकेची बाजू मांडली न गेल्यामुळे "डीआरएटी'ने ही याचिका सोमवारी फेटाळली. त्यामुळे महापालिकेवर पुन्हा हुडकोकडून बॅंक खाते गोठावणे, महापालिकेची मालमत्ता सील करणे अशी टांगती तलावर निर्माण झाली आहे. याबाबत महापालिकेकडून "डीआरएटी'त पुन्हा याचिका दाखल केली जाणार असून, त्यासाठी तज्ज्ञ वकिलाची तसेच महापालिकेची बाजू मांडण्यासाठी उपायुक्त लक्ष्मीकांत 
कहार यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. 

आमदारांनी आयुक्तांची घेतली भेट 
"डीआरएटी'ने हुडको कर्जप्रकरणी महापालिकेची याचिका फेटाळल्याने बॅंक खाती गोठविणे व मालमत्ता सील करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आज तातडीने आमदार भोळे यांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांची भेट घेतली. तसेच हुडको कर्ज प्रकरणाबाबत "डीआरएटी'ने फेटाळलेली याचिका व पुन्हा याचिका दाखल करण्यासंदर्भात चर्चा झाली. 

कामकाजासाठी तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती 
हुडको प्रकरणी पुन्हा "डीआरएटी' प्राधिकरणात अपील करण्यासाठी आयुक्त डांगे यांनी 
मुंबई येथील तज्ज्ञ वकिलांशी चर्चा केली. तसेच याचिका दाखल करण्यासंदर्भात या तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती करण्यात येऊन महापालिकेकडून बाजू मांडण्यासाठी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. 

Web Title: marathi news jalgaon DRAT yachika muncipal corporation