बनावट आवाजातील क्‍लिपद्वारे मतदारांना आवाहनाचे "कॉल्स' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

जळगाव ः महापालिका निवडणूक प्रचारात काही व्यक्तींनी खोडसाळपणा करून आपल्या आवाजाची ऑडिओ क्‍लिप बनवून तिचा प्रचारासाठी वापर करीत असल्याचा प्रकार समोर आला असून, ही थेट फसवणूकच आहे. त्यामुळे ही क्‍लिप कुणी तयार केली, याबाबत चौकशी करून कारवाई करावी, अशी तक्रार आपण पोलिसांकडे करणार आहोत, असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. 

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी "मी एकनाथ खडसे बोलतोय... पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आपण सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे यावेळी भाजप उमेदवारांना मतदान करून पालिकेत परिवर्तन घडवा', अशा आशयाचे आवाहन आपल्या आवाजाच्या क्‍लिपद्वारे प्रमोशन कॉलवरून तसेच सोशल मीडियावर करण्यात येत आहे. मुळात असे कोणतेही आवाहन करणारी कोणतीही क्‍लिप आपण स्वत: किंवा आपल्याला विचारून अन्य कुणीही केलेली नाही. 

पक्षाकडूनही आदेश नाही 
मी पक्षाचा चाळीस वर्षांपासून कार्यकर्ता असून पक्षासाठी झटत आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या आठवड्यापासून प्रचारात सक्रिय होऊन 25 सभा घेतल्या. पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मी मोठ्या व कोपरा सभा घेत असून त्यांना प्रतिसादही मिळत आहे. असे असताना पक्षाने मला आदेश दिला असता तर आपण ऑडिओ व व्हिडिओ क्‍लिप तयार करून दिली असती. परंतु अशाप्रकारे कुणी परस्पर क्‍लिप तयार करून असे प्रकार करत असेल तर ते चुकीचे व फसवणूक आहे. यासंदर्भात आपण निवडणूक आयोग व पोलिसांकडेही तक्रार करणार असल्याचे खडसेंनी सांगितले. 

Web Title: marathi news jalgaon dublicate vice clip khadse