मूलभूत सुविधांचे रेल्वेने मांडले "दुकान' 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 मे 2018

मूलभूत सुविधांचे रेल्वेने मांडले "दुकान' 

जळगावः एकीकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात मोहीम राबविली जात असून हागणदारी मुक्तीसाठी प्रयत्न होत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या रेल्वे प्रशासनाने सर्व प्रकारच्या सुविधांचा अक्षरश: "धंदा' मांडला आहे. अगदी स्थानकांवर स्वच्छतागृहाच्या वापर म्हणून लघुशंकेसाठी एक-दोन रुपये तर शौचासाठी पाच ते दहा रुपयांचे शुल्क आकारण्याचे "दुकान'च रेल्वेने मांडले आहे. याबद्दल प्रवाशांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. 

रेल्वेस्थानकावर स्वच्छतागृहात जायचे असल्यास नागरिकांना अगोदर एक रुपया द्यावा लागत आहे, हे चित्र जळगाव रेल्वेस्थानकवरचेच नसून सर्वच मोठ्या स्थानकांवर हा प्रकार सुरू झाल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे सर्वच स्थानकांवर अशाप्रकारचे ठेके रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. शौचासाठी व स्नानासाठीचा मक्ता समजण्यासारखा आहे, मात्र लघुशंकेसाठीही शुल्क आकारण्याचा ठेका देऊन रेल्वेने पुरुषांची गैरसोय तर स्त्रियांची कुचंबणा केली आहे. 

14-1 
महिलांसाठी वेगळे दर 
जळगाव रेल्वेस्थानकाच्या तिकीट घराच्या बाजूला शौचालय आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांचा ठेका मेसर्स सोमशेखर या कंपनीला देण्यात आला आहे. शौचालयामध्ये लघुशंकेसाठी एक रुपया, शौचासाठी पाच रुपये तर शौचासह स्नानासाठी पंधरा रुपयांचा दर रेल्वे प्रशासनाने निर्धारित केला आहे. शौचालयास जाणाऱ्यांना पाच ते दहा रुपयांची आकारणी होत आहे. मुख्य म्हणजे लघुशंकेसाठी पुरुषांना एक रुपया तर स्त्रियांकडून 2 रुपये शुल्क आकारले जात आहे. 

14-1 
पैसे नसल्यास अडचणीचे 
प्रवाशांकडे बऱ्याचदा सुट्या पैशांची समस्या असते. शिवाय, महिला वर्गाकडे बऱ्याचदा पैसे नसल्याने लघुशांकेसाठी जायचे असल्यास त्यांच्यासाठी अडचणीचे ठरते. असाच प्रकार सोमवारी (14 मे) दुपारी घडला. वयोवृद्ध महिलेकडे पैसे नसल्याने संबंधित ठेकेदाराच्या व्यक्‍तीकडून आत जाण्यास मज्जाव करत महिलेशी वाद घातला. या ठेकेदारीवर कोणाचे नियंत्रण नसल्याने मनमानी ठेकेदारी सुरू असल्याच्या तक्रारी होत आहेत. 
--------- 
कोट 
भुसावळसह जळगाव रेल्वे स्थानकात शौचालयात ठरलेल्या दराप्रमाणे सेवा दिली जाती की नाही याची प्रत्येकवेळी तपासणी केली जाते. यासाठी जास्त पैसे आकारल्यास प्रवाशांनी तातडीने तेथील पुस्तकात तक्रार करावी. संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल. 
- सुनील मिश्रा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, भुसावळ रेल्वे. 
 
Web Title: marathi news jalgaon dukan