बनावट विडी विक्री करणाऱ्यांवर छापे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

जळगाव ः येथील शेरा चौकात असलेल्या एका पानमसाला दुकानावर एलसीबीच्या पथकाच्या साहाय्याने आयपी इन्वेस्टीगेशन डिटेक्‍टिव्ह प्रा.लि. या कंपनीच्या पथकाने आज दुपारी छापा टाकला. यावेळी 30 नंबर विडी आणि संभाजी बिडीचा बनावट माल हस्तगत करण्यात आला. जिल्ह्यात करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. 

संभाजी बिडी आणि 30 नंबर विडीच्या बनावट उत्पादनांना आळा घालण्यासाठी कंपनीने आयपी इन्व्हेस्टिगेशन डिटेक्‍टिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीला जबाबदारी सोपविली आहे. जळगाव शहरात काही ठिकाणी या विडीचा बनावट माल विक्री केला जात असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. त्यानुसार एजन्सीचे प्रतिनिधी संतोष गांधी, अनिल मोरे, मंगेश सोनवणे यांच्यासह पथकाने याबाबत एलसीबीला माहिती दिली. 

पथकाने टाकला छापा 
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक महेश जानकर यांच्यासह कर्मचारी व एजन्सीच्या प्रतिनिधींनी मेहरूण परिसरातील शेरा चौकात असलेल्या गंगराडे पान मसाला या दुकानात छापा टाकला. त्याठिकाणी बनावट विडीचा 29 हजारांचा मुद्देमाल मिळून आला. शेरा चौकासह पथकाने तिजोरी गल्लीत असलेल्या ओम सुपारी आणि सी. के. सुपारी या दोन्ही दुकानांमध्ये देखील तपासणी केली. परंतु त्यांच्याकडे काहीही आढळून आले नाही. 
 
Web Title: marathi news jalgaon duplicate bidi lcb

टॅग्स