दुष्काळाच्या अनुदानाचे वाटप रखडले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

जळगाव ः जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे केंद्रस्तरीय दुष्काळ पाहणी समितीने दौरा केला होता. त्यानंतर जिल्ह्यासाठी पाचशे कोटींचे दुष्काळी अनुदान मिळण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. त्यानंतर विविध तीन टप्प्यात 400 कोटी 1 लाख 46 हजार 480 रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनास मिळाला. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या कामांमुळे महसूल यंत्रणेला हा सर्व निधी वाटप करता आलेला नाही. मिळालेल्या निधीपैकी केवळ 298 कोटी 71 लाख 74 हजार 883 एवढ्या निधीचे शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. 

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ आहे. यंदा पाऊसही कमी झाला. यामुळे खरिपाच्या उत्पादनात कमालीची घट झाली. शेतकऱ्यांना हाती-तोंडी आलेला घास पाण्याअभावी निसर्गाने हिरावून घेतला आहे. उभी पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. विहिरींच्या पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. जिल्ह्यात पडलेल्या पावसाच्या आधारे तेरा तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळण्यासाठी केंद्र शासनाने एकूण तीन हप्त्यात 404 कोटी एक लाख 46 हजार 480 निधी पाठविला. त्यापैकी 298 कोटी 71 लाख 74 हजार 883 एवढा निधी वाटप करण्यात आला. महसूल प्रशासनाने उर्वरित निधी त्वरित वाटप करावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. 
 
आतापर्यंत झालेले अनुदान वाटप असे 
तालुका--प्राप्त अनुदान--गावांची संख्या--निधी दिलेले शेतकरी--बॅंकेत जमा निधी 
जळगाव--289460621--92--30018--264757341 
जामनेर--515933701--152--52745--477046600 
भुसावळ--163699655--54--29845---118945146 
बोदवड--144153287--51--13469--119010096 
मुक्ताईनगर--219464308--81--17934--151366000 
पारोळा--325449589--114--35269--242369471 
यावल--281705086--84--22069--165802091 
रावेर--319701875--121--45533--166663245 
अमळनेर--375048078--154--33385--254374382 
चोपडा--325116341--117--45968--325116341 
पाचोरा--378131996--129--36017---198245712 
भडगाव---220062652--63--19256--129465518 
चाळीसगाव--482219291--136--48592--374012940 
एकूण--4040146480--1348--424598---2987174883 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon dushkal anudan stop