Loksabha 2019 : दुष्काळात प्रचार करताना नेत्यांची परीक्षा! 

तुषार देवरे
रविवार, 14 एप्रिल 2019

देऊर ः लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारात रंगत येऊ लागली आहे. रणरणत्या उन्हाळ्यात आणि दुष्काळातील ही निवडणूक नेते, उमेदवारांसाठी तापदायक ठरू पाहात आहे. यंदा जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम व गडद तीव्र स्वरूपाचा दुष्काळ आहे. त्यामुळे मार्चपासूनच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. अशात संतप्त भावनांचा सामना उमेदवाराला करावा लागत असल्याचे चित्र आहे. 
 
काम उपलब्ध नसल्याने दुष्काळी अनेक गावांतील बरेच जण उदरनिर्वाहासाठी शहरांकडे धाव घेत आहेत. बांधकामासाठी मजुरांची गरज लाभते; मात्र वाळू व पाणीटंचाई सोबत इतर कारणांनी बांधकाम क्षेत्रातही मंदी आहे. त्याचा फटका स्थलांतर करू इच्छिणाऱ्यांना बसू लागला आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासोबतच चा-याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. 
जलस्रोत आटल्याने ग्रामस्थांना स्वतःसोबत जनावरांसाठीही दूरवरून पाणी आणावे लागत आहे. स्वतःसाठी पुरेसे पाणी मिळत नसताना जनावरांसाठी पाणी कुठून उपलब्ध करावे, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर आहे. पर्जन्यमान कमी झाल्याने आणि दीर्घकाळ विविध पाणी योजनांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे ही स्थिती ओढवली आहे. गावोगावी हात जोडत मतांचा जोगवा मागणाऱ्यांना त्याचे उत्तर द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाणी योजना तयार असूनही जलस्रोत आटल्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत नाही. त्यांना हातपंप किंवा इतर साधनांवर अवलंबून राहावे लागते. टॅंकरने पाणीपुरवठ्यास मर्यादा आहेत. टंचाईत ठिकठिकाणी चार ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. या कालावधीत होणारा प्रचार नेते, उमेदवारासाठी परीक्षेचा काळ ठरत आहे. 

Web Title: marathi news jalgaon dushkal prachar test candidate