दुष्काळाने जिल्हा त्रस्त, मंत्री स्वार्थात मस्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

ळगाव : जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळाची स्थिती असून जिल्ह्यातील मंत्र्यांना त्याचे गांभीर्य नाही. दुष्काळात शेतकरी आणि टंचाईमुळे नागरिक होरपळत असताना मंत्री त्यांच्याच स्वार्थात मस्त असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा बैठकीत करण्यात आली. दुष्काळाचा तालुकानिहाय आढावा घेताना प्रत्येक तालुक्‍यात दौरा करून त्यासंदर्भात उपाययोजनांसाठी पक्ष प्रयत्न करेल, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. 

ळगाव : जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळाची स्थिती असून जिल्ह्यातील मंत्र्यांना त्याचे गांभीर्य नाही. दुष्काळात शेतकरी आणि टंचाईमुळे नागरिक होरपळत असताना मंत्री त्यांच्याच स्वार्थात मस्त असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा बैठकीत करण्यात आली. दुष्काळाचा तालुकानिहाय आढावा घेताना प्रत्येक तालुक्‍यात दौरा करून त्यासंदर्भात उपाययोजनांसाठी पक्ष प्रयत्न करेल, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. 
जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक आज पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रदेश अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष गफ्फार मलिक, माजी खासदार ऍड. वसंतराव मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेव चौधरी, कार्याध्यक्ष विलास पाटील, महिला आघाडीच्या कल्पना पाटील, नीला चौधरी, सोपान पाटील, मंगलाताई पाटील, प्रतिभा शिरसाठ, वाल्मीक पाटील, अभिषेक पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते. 
 
तालुकानिहाय दौरा : ऍड. पाटील 

ऍड. रवींद्र पाटील म्हणाले, जिल्हाभरात दुष्काळी स्थिती असून सरकार त्याबद्दल उदासीन आहे. प्रत्येक तालुक्‍यातील स्थितीचा आपण आढावा घेतला असून आता प्रत्येक तालुक्‍यात जाऊन पाहणी करू. सरकारने दुष्काळाचा उपाययोजना प्रामाणिकपणे राबविल्या पाहिजे. चारा वाहतुकीला राज्याबाहेर बंदी करून, रोहयोची कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यायला हवी. 
 
मंत्री स्वार्थात मस्त : देवकर 
गुलाबराव देवकर म्हणाले, दुष्काळी तालुक्‍यांमधून एरंडोल, धरणगावला वगळून सरकारने अन्याय केला आहे. कार्यकर्त्यांनी याविरोधात पेटून उठले पाहिजे. दुष्काळी स्थिती असताना मंत्री त्यांचा स्वार्थ साधण्यात मश्‍गूल आहेत. दुष्काळी स्थितीच्या संदर्भात कार्यकर्त्यांनी जागरूक राहिले पाहिजे. आगामी निवडणूक अस्तित्वाची असून त्यासाठी सज्ज राहावे. 
 
निवडणुकीमुळे मंदिर वाद : मलिक 
गफ्फार मलिक म्हणाले, वर्षभरात निवडणुका असल्यामुळे भाजपकडून मंदिर- मशीद वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जात आहे. या सरकारला दुष्काळ, विकासाशी देणेघेणे नाही. सरकार सर्वस्तरावर अपयशी ठरत असल्याने आता जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 
 
शरद पवारांच्या वाढदिवशी समाजोपयोगी उपक्रम 
12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस असून तो साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने यादिवशी गरजू नागरिकांसाठी आरोग्य व नेत्रतपासणी शिबिर, कुपोषित मुलांना पोषण आहाराचे वाटप असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भर द्यावा, असे या बैठकीत ठरले. 

Web Title: marathi news jalgaon dushkal rashtrawadi mitteing