माध्यमिक शिक्षणाधिकारी महाजनांची चौकशी; कार्यकारी अभियंता नाईकही फेऱ्यात 

माध्यमिक शिक्षणाधिकारी महाजनांची चौकशी; कार्यकारी अभियंता नाईकही फेऱ्यात 

जळगाव ः जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. नाईक व माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या कामाबाबत तक्रारी आल्या होत्या. तक्रारी अधिक वाढल्याने दोन्ही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. सदरचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांच्या आदेशावरून सामान्य प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. 
जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभाग, शिक्षण विभागाबाबत अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात लघुसिंचन विभागातंर्गत जिल्ह्यात झालेल्या जलयुक्‍त शिवारातील कामांबाबात काही तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. शिवाय विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. नाईक यांना बडतर्फ करण्याचा ठराव गेल्या वर्षी सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. नाईक यांच्यावरील बडतर्फीचा ठपका आणि त्यानंतर आलेल्या तक्रारींवरून त्यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. 

समायोजन शिक्षणाधिकाऱ्यांच्या अंगाशी 
माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्याबाबतीत गेल्या काही महिन्यात बदल्या, समायोजन यासह बऱ्याच तक्रारी वाढल्या आहेत. प्रामुख्याने महाजन यांनी माध्यमिक शाळांमधील अतिरिक्‍त ठरलेल्या 44 शिक्षकांचे परस्पर समायोजनाची प्रक्रिया करून टाकली होती. ही प्रकिया राबविताना शिक्षण सभापती यांना देखील विश्‍वासात घेतले नसल्याने सभापती भोळे यांनी समायोजन रद्द करण्याबाबत तक्रार केली होती. यानंतर देखील शिक्षणाधिकारी यांची समायोजन रद्द केले नाही. मुख्य म्हणजे समायोजनाच्या इतिवृत्तावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सही न घेताच प्रक्रिया पूर्ण केली आहे. शिवाय, सभांना उपस्थित न राहणे. "सीईओ' किंवा सभापती यांनी बोलाविले तरी न येणे. त्याचप्रमाणे काही गैरप्रकारांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या कारणांवरून शिक्षणाधिकारी महाजन यांचीही विभागीय चौकशी सामान्य प्रशासन विभागाकडून प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com