माजी मंत्री आमदार खडसे यांचे आगमन; प्रचारात लवकरच होणार सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

मुक्‍ताईनगर ः गेल्या पंधरा दिवसापासून आमदार एकनाथराव खडसे हे मुंबई येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांचे मुक्ताईनगरात आगमन झाले व सकाळ पासूनच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निवडणुकीचा आढावा श्री. खडसेंनी घेतला. 

मुक्‍ताईनगर ः गेल्या पंधरा दिवसापासून आमदार एकनाथराव खडसे हे मुंबई येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांचे मुक्ताईनगरात आगमन झाले व सकाळ पासूनच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निवडणुकीचा आढावा श्री. खडसेंनी घेतला. 

गेल्या पंधरा दिवसापासून आमदार खडसे हे मुंबई येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात आणि जिल्ह्यात महायुतीच्या प्रचारामध्ये त्यांची उणीव भासत होती. आमदार खडसे हे आजारी असले तरी मुंबई येथून दूरध्वनीद्वारे प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क करून दिवसभराच्या प्रचाराचा आढावा घेत होते. आज त्यांनी दिवसभर रावेर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधला. यावेळी महानंदच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, प्रा. सुनील नेवे, जिल्हा चिटणीस राजू माळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले, तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, सरचिटणीस संदीप देशमुख, रामभाऊ पाटील, सुनील काटे, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे आदी उपस्थित होते. 
 
गेल्या पंधरा दिवसापासून मुंबई येथे उपचार घेत होतो. आता तब्बेत व्यवस्थित आहे. माझ्या अनुपस्थिती मध्ये कार्यकर्त्यांनी उत्तमपणे प्रचाराचा किल्ला लढविला आहे. त्याबद्दल महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार. आपण केलेल्या विकास कामांमुळे महायुतीचा विजय हा नक्की असून मताधिक्य वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणखी जास्त मेहनत घ्यावी. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर मी प्रचारात सक्रिय होणार असून लवकरच सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीला येणार आहे. 
-एकनाथराव खडसे आमदार, मुक्‍ताईनगर 

Web Title: marathi news jalgaon eknath khadse come back home